Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; 488 PSI अधिकाऱ्यांना बढती

spot_img

महाराष्ट्र पोलीस दलात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय फेरबदलांच्या मालिकेला सोमवारीही वेग कायम राहिला. राज्याच्या गृह विभागाने मुंबई पोलीस दलात महत्त्वाच्या पदांवर बदल करत मोठ्या प्रमाणावर बदली आणि बढतीचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे पोलीस प्रशासनात नव्या जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले असून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

नवीन आदेशानुसार, राज्यपालांचे ‘एडीसी’ म्हणून कार्यरत असलेले अभय सिंह देशमुख यांची मुंबई पोलीस दलातील झोन ७ चे नवे पोलीस उपायुक्त (DCP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी या पदाची जबाबदारी सांभाळणारे हेमराज राजपूत यांची बदली दक्षिण मुंबई वाहतूक विभागात करण्यात आली असून त्यांच्याकडे त्या विभागाच्या DCP पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर, दक्षिण वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त प्रशांत परदेशी यांची बदली वरळी येथील सशस्त्र पोलीस दलात करण्यात आली आहे. या बदलांमुळे मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेररचना झाल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, राज्यभरातील ४८८ पोलीस उपनिरीक्षकांना (PSI) सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पदावर बढती देण्यात आली आहे. अनेक अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून बढतीच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे हा निर्णय पोलीस दलासाठी महत्त्वाचा आणि दिलासादायक मानला जात आहे.

याशिवाय, अमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत असलेले नवनाथ धवळे यांची मुंबई गुन्हे शाखेच्या शोध पथक-१ चे नवे DCP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पुढील आदेश येईपर्यंत त्यांच्याकडे अमली पदार्थ विरोधी पथकाचा अतिरिक्त कार्यभारही कायम राहणार आहे. तसेच सायबर गुन्हे शाखेतील अधिकारी पुरुषोत्तम कराड यांची उत्तर विभाग-१ चे DCP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गृह विभागाच्या या निर्णयांमुळे पोलीस प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ