Chhatrapati Sambhajinagar : “बहिरा झाला का कलेक्टर?”; संतापलेल्या सरपंचांचा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात राडा

spot_img

छत्रपती संभाजीनगरात निवडणूक कामावरून प्रशासनाविरुद्ध शिक्षकांचा एल्गार; ‘एसआयआर’ मॅपिंगच्या जाचक कामामुळे शिक्षक वर्गात प्रचंड संताप

विवेक चौधरी, जिल्हा प्रतिनिधी

“निवडणूक कामाचा अवाजवी ताण देऊन शिक्षकांचे बळी घेणार का? बहिरा झाला का कलेक्टर?” अशा अत्यंत संतप्त शब्दांत सरपंच मंगेश साबळे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाला जाब विचारला. निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांना या ड्युटीतून त्वरित वगळण्यात यावे, या मागणीसाठी सरपंचांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात काही काळ प्रचंड गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा ताण लादणाऱ्या प्रशासनाविरुद्ध लोकप्रतिनिधींनीच आता थेट शिंग फुंकले आहे.

हा वाद उफाळून येण्याचे मुख्य कारण म्हणजे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘बीएलओ’ (Booth Level Officer) म्हणून कार्यरत असलेल्या एका शिक्षकाला सोमवारी शासकीय काम करत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मतदार याद्यांच्या ‘एसआयआर’ (SIR) मॅपिंगचे कठीण काम करत असताना हा प्रकार घडल्याने संपूर्ण शिक्षक वर्गात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकाला हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटनेनंतर गुरुजींनी विद्यार्थ्यांना शिकवायचे की केवळ शासकीय मोहिमा राबवत बसायच्या? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या धक्कादायक घटनेमुळे शिक्षकांवरील मानसिक आणि शारीरिक छळाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी आणि शिक्षकांना बीएलओच्या कामातून कायमचे मुक्त करावे या प्रमुख मागणीसाठी आता शिक्षक संघटना अत्यंत आक्रमक झाल्या आहेत.

“शाळा सांभाळून निवडणूक आणि मतदार याद्यांचे काम करणे म्हणजे शिक्षकांवर मानसिक अत्याचार आहे. एका शिक्षकाला यामुळे जीव गमवावा लागण्याची वेळ आली आहे, प्रशासन अजून किती बळींची वाट पाहतंय?”

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ