spot_img

Crash Weight Loss : झपाट्याने होणारा वेट लॉस आरोग्यासाठी ठरू शकतो घातक

spot_img

वजन कमी करण्यासाठी आयज अनेक पर्याय उपलब्ध आहेत पण काहीजण, Crash Weight Lloss म्हणजेच लवकर वजन कमी करण्याचा विचार करतात. पण हा निर्णय तब्येतीच्या दृष्टीनं फायद्यापेक्षा जास्त नुकसानदायी ठरू शकतो. क्रॅश वेट लॉस करण्याचे शरीरावर हानिकारक परिणाम होऊ शकतात. त्याचे दुष्परिणाम पाहूयात

जास्त काळ कमी कॅलरीज घेतल्यानं शरीराला आवश्यक पोषक घटकांपासून वंचित राहावं लागतं, ज्यामुळे प्रथिनं, लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होते. अशावेळी, अशक्तपणा, चक्कर येणं, केस गळणं, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती, वारंवार संसर्ग होणं, सर्दी आणि आजार होणं अशी लक्षणं जाणवू शकतात. तसेच बराच काळ काहीही न खाल्ल्यानं चरबी तर कमी होईलच पण जलद वजन कमी झाल्यामुळे स्नायूंचं प्रमाण कमी होऊ शकतं. यामुळे शरीरावर परिणाम होतात. शक्ती कमी होणं आणि त्वचा सैल होणं, चयापचय मंदावणं अशा समस्या जाणवतात. चिडचिड होणं, ताणतणाव, थकवा येणं, एकाग्रतेचा अभाव यांसारखे गंभीर परिणाम होऊ शकतात.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ