विवाहबाह्य संबंध ठेवल्याने विवाहितेने गमावले प्राण
भारतात विवाहसंस्थेला फार महत्वाचे स्थान आहे.आपल्याकडे सावित्री-सत्यवाणाची कथा सांगितली जाते.सातही जन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाला स्त्रिया फेऱ्या मारतात.पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधाचे (Extramarital Affair) प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे.‘लव्ह मॅरेज’ असो की ‘अरेंज मॅरेज’ जोडपी अजिबातच नात्यांचा आदर करताना दिसत नाहीयेत.
मध्यप्रदेशमधील (Madhya Pradesh) निवाडी जिल्ह्यातील रजपुरा गावात राहणारी रोहिणी राजपूत नावाची विवाहित महिला अचानक गायब झाली म्हणून तिच्या पतीने आणि नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेचच चौकशी सुरु केली. आणि त्यानंतर चौकशीत जे समोर आले ते ऐकून राजपूत कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. रोहिणीचे रतिराम नावाच्या तरूणासोबत लग्नाआधी अफेअर होतं. मात्र काही कारणास्तव रतिराम बरोबर रोहिणीचे लग्न होऊ शकले नाही. लग्नानंतरही रोहिणी रतिरामला विसरू शकली नव्हती. ती त्याला लपून-छपून भेटायची. एवढेच नाही तर दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील होते. पण काही दिवसांपासून रोहिणीने लग्नासाठी रतिरामच्या मागे लावला होता. ती त्याच्यासाठी तिच्या नवऱ्याला देखील सोडायला तयार होती. पण रतीराम रोहिणीसोबत लग्न करण्यासाठी तयार नव्हता. त्याला तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं. मग काय रोहिणीच्या सततच्या मागणीला कंटाळलेल्या रतिरामने आपल्या प्रेयसीच्याच हत्येचा कट रचला. या प्लानिंगमध्ये त्याने आपल्या मित्रांची मदत देखील घेतली.2 ऑक्टोंबरच्या रात्री त्याने रोहिणीला गावात एका घरी भेटण्यासाठी बोलावलं. तिथे त्यांच्यात शरीरसंबंध प्रस्थापित झाले. यादरम्यान रतिरामने आपल्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या रोहिणीची गळा आवळून क्रूरपणे हत्या केली.
यानंतर आरोपी रतीरामने मित्र कालीचरण, मुकेश आणि ज्ञान सिंहसोबत मिळून घरातच खड्डा खोदला व रोहिणीचा मृतदेह त्यात दफन केला. माती आणि शेणाने तो खड्डा व्यवस्थित बुजवण्यात आला. एवढ्यावरच न थांबता रोहिणीचा मृतदेह दफन केलेल्या ठिकाणीच पलंग टाकून रतीराम आरामात दोन दिवस झोपून होता,असं पोलिस तपासात समोर आलंय. जेव्हा संशयाच्या आधारावर पोलिसांनी रतीरामला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा सर्व गोष्टींचा खुलासा झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रतीरामला अटक केली मात्र कस्टडीत पोलिसांना चकवा देऊन तो पळून गेला. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलय. या सगळ्या प्रकरणात निवाडी पोलिसांची भूमिका सुरुवातीपासून संशयास्पद होती. पोलिसांनी मागच्या काही दिवसांपासून हे प्रकरण दाबून ठेवलेलं. आरोपी पोलीस कोठडीतून पळून गेल्यानंतर नाईलाजाने पोलिसांना हे प्रकरण समोर आणावे लागले.




