spot_img

Beed News : बीडमधील चालत्या बसमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेमुळे खळबळ

spot_img

सध्याच्या काळात फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. प्रवासादरम्यान तर आपलं सामान लक्षपूर्वक सांभाळावं लागतं. बीड (Beed) मध्ये चालत्या बसमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रवासी महिलेच्या कपड्यांच्या बॅगेतून मौल्यवान सोन्याचे दागिने लंपास झाले. विशेष म्हणजे पोट दुखत असल्याचे सांगितल्याने जिला जागा दिली तीच हात साफ करून निघून गेली. अडीच लाखांचे दागिने चोरीला गेल्याचा गुन्हा गेवराई पोलिसांत दाखल झाला आहे. या घटनेतील फिर्यादी पुनम शुभम बडे (रा. जायकवाडी कॅम्प, बागपिंपळगाव, ता. गेवराई) या संक्रांत सणानिमित्त 12 जानेवारी रोजी माहेरी मोठेवाडी (ता. माजलगाव) येथे गेल्या होत्या. सणानंतर 19 जानेवारी रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास त्या आपल्या वडिलांसह माजलगाव बसस्थानकातून गेवराईकडे बसने निघाल्या होत्या. प्रवास सुरळीत सुरू असतानाच गाढी परिसरात ही धक्कादायक घटना घडली.

चोरी गेलेल्या दागिन्यांमध्ये 2.5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 4 ग्रॅम वजनाचे कानातील फुल तसेच 3 तोळे 5 ग्रॅम वजनाचे साखळीचे गंठण यांचा समावेश असून एकूण ऐवज सुमारे 2 लाख 49 हजार रुपयांचा आहे. या घटनेबाबत पुनम बडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलीस बसमधील प्रवासी, मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी महिलेचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ