spot_img

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा! आता अमेरिका युरोपीय देशांवर लादणार नाही टॅरिफ

spot_img

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठा यू-टर्न घेतला आहे. त्यांनी यापूर्वी ग्रीनलँडबाबत युरोपियन देशांवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफची धमकी मागे घेतली आहे. ते म्हणतात की ग्रीनलँडवरील कराराची चौकट तयार झाली आहे. होय, डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी घोषणा केली की ते ग्रीनलँडवरील अमेरिकेच्या नियंत्रणाबाबत युरोपमधील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर लादण्यात येणारे टॅरिफ रद्द करत आहेत, कारण ते आणि नाटो नेते ग्रीनलँडच्या सुरक्षेबाबत ‘भविष्यातील कराराच्या चौकटी’वर सहमत झाले आहेत. युरोपियन देशांवर हे टॅरिफ १ फेब्रुवारीपासून लादण्यात येणार होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथआउट’ वर पोस्ट करत म्हटले आहे की ते अनेक युरोपीय देशांवर कर लादण्याची धमकी मागे घेत आहेत. त्यांनी आर्क्टिक सुरक्षेबाबत नाटोसोबतच्या नवीन चौकटीचा उल्लेख केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी दावोस येथील जागतिक आर्थिक मंचात ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिका बळाचा वापर करणार नाही असे विधान केल्यानंतर अचानक हा यु-टर्न घेतला आहे.डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ धमकी मागे घेतली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांच्याशी माझी खूप उत्पादक बैठक झाली. याच्या आधारे, आम्ही ग्रीनलँड आणि खरंच संपूर्ण आर्क्टिक प्रदेशाबाबत भविष्यातील करारासाठी एक चौकट तयार केली आहे. जर हा उपाय पूर्ण झाला तर तो अमेरिका आणि सर्व नाटो देशांसाठी खूप फायदेशीर ठरेल. या समजुतीच्या आधारे, मी १ फेब्रुवारीपासून लागू होणारे शुल्क लागू करणार नाही.”

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ