spot_img

Navi Mumbai Crime : तुर्भेतील हॉटेवर छापा टाकून 7 महिलांची पोलिसांनी केली सुटका,3 आरोपींना अटक

spot_img

नवी मुंबई प्रतिनिधी : विजय गायकवाड

नवी मुंबई (Navi Mumbai) पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत असलेल्या गुन्हे शाखांना आपल्या हद्दीत असलेले अनैतिक व्यवसाय करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने नवी मुंबई AHTU कक्षाचे वपोनि पृथ्वीराज घोरपडे यांना गुप्त बातमीदाराने बातमी दिली की, तुर्भेनाका येथील राज लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये ग्राहकांना वेश्यागमनासाठी 5000 रू घेऊन महिला व मुली पुरवल्या जातात त्या अनुषंगाने सदर लॉज मध्ये बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करून बनावट ग्राहकाने सांकेतिक इशारा दिल्या नंतर AHTU कक्षच्या पोलिसांनी सदर लॉजवर छापा घालून त्या ठिकाणी असलेल्या 7 पीडित महिलांची सुटका केली व 3 आरोपींना अटक करण्यात आली.

याबाबत AHTU चे वपोनि पृथ्वीराज घोरपडे यांनी अशी प्रसारमाध्यमांना अशी माहिती दिली की, तुर्भे येथील राज लॉजिंग अँड बोर्डिंगचा मॅनेजर लॉज मध्ये आलेल्या ग्राहकास 5000/-रू घेऊन स्वतः उपलब्ध केलेल्या महिला दाखवून त्यातील एक महिला पसंत करण्यास सांगून त्या महिलाकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने बनावट ग्राहकास हॉटेल राज अँड बोर्डिंग, D/02 तुर्भे नाका येथे पाठवले असता बनावट ग्राहक पाठवले व बनावट ग्राहकाच्या सांकेतिक इशाऱ्या वरून पोलीस पथकाने दि. 4 जानेवारी रोजी संध्याकाळी 18:37 वाजता सदर लॉजवर छापा टाकला असता त्या ठिकाणी 7 पीडित महिला आढळून आल्या लॉज मॅनेजर अजय गोस्वामी,महिला पुरवणारा किशोर पूर्णचंन्द्र साहू, वेटर अजयकुमार हिरालाल साव, व पाहिजे असलेला आरोपी लॉज चालक करुणाकर शेट्टी, यांनी आपसात संगनमत करून 7 पीडित महिला यांना लॉज वेश्या व्यवसायासाठी वापरला म्हणून सदर तिन्ही आरोपी विरुद्ध तुर्भे पोलीस ठाण्यात BNS 2023,कलम 143 (3),3(5),सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 1956 कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीना दि. 4 जानेवारी रोजी अटक करण्यात आली असून त्यांना बेलापूर कोर्टात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना दि. 6 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत सहा. पो. आ. धर्मपाल बनसोडे, AHTU गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि पृथ्वीराज घोरपडे, सपोनि योगेश देशमुख, पो. उप नि. सरिता गुडे, पो. ह. अनिल मांडोळे, पो. शि. परासूर, चव्हाण, राजकिरण कोलते, किशोर पाटील, सविता म्हात्रे, ज्योती अडकमोल, मनीषा पावडे, व चालक मोहिते यांनी सहभाग घेतला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ