ओतूर प्रतिनिधी : रमेश तांबे
सांगली (Sangli) जिल्ह्यातील खानापूर गावातील सराफ दुकानावर दिवसा सशस्त्र दरोडा टाकणारी सराईत गुन्हेगारांची टोळी ४८ तासांत केली जेरबंद करण्यात आली. सुमारे ५६ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ७० लाख ३२ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तसेच हवेली आणि वेल्हे पोलीसांनी हस्तगत केला आहे.
हवेली पोलीस स्टेशनमध्ये दि.२६ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि.२६ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दिवसाढवळ्या पाच आनोळखी दरोडेखोरांनी हातात तलवार,कोयता अशी हत्यारे घेवून खानापूर गावातील वैष्णवी ज्वेलर्स या सराफ दुकानावर सशस्त्र दरोडा टाकला. दुकानातील मालक व महिला कामगार यांना हत्याराचा धाक दाखविला आणि सुमारे ८४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सुमारे एक कोटी पाच लाख रूपये किमतीचा मुद्देमाल चोरला. सदर प्रकाराबाबत दुकान मालक यांच्या पत्नी राणी अमोल बाबर वय २८ वर्षे, व्यवसाय सोनार दुकान, रा, खानापूर, ता. हवेली जि. पुणे मुळ रा.वाळज शिवेचामळा ता. खानापूर जि.सांगली यांनी वरील प्रमाणे फिर्याद नोंदविली आहे. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी घटनास्थळी भेट दिली.सराफ दुकानावर भर दिवसा सशस्त्र दरोडा पडल्याने खानापूर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरोडेखोरांनी भर दिवसा सशस्त्र दरोडा टाकल्याने एक प्रकारे पोलीसांना आव्हान केले होते, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची चार पथके, हवेली पोलीस स्टेशन व वेल्हे पोलीस स्टेशन कडील तपास पथके अशी एकूण सहा तपास पथके तयार केली. गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन व सुचना देण्यात आल्या, दरोडेखोरांनी हा दरोडा टाकल्यानंतर पानशेतच्या दिशेने गेल्याचे साक्षीदार यांनी सांगितले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच पोलीस निरिक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथर्कामार्फत दरोडेखोरांचा शोध सुरू करण्यात आला.
सदर गुन्ह्यात दोन मोटार सायकलचा वापर झालेला होता. तपास पथकांनी सीसीटीव्हीचे आधारे मोटार सायकलचा मागोवा घेण्यास सुरूवात केली. ठिक-ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. दरोडेखोर यांनी दोन्ही मोटार सायकल वेगवेगळ्या रस्त्याने वेल्हे गावाचे दिशेने नेल्याची माहिती प्राप्त झाली. तपास पथकांनी सलग दोन दिवस, दिवस-रात्र तपास करून गुन्ह्यातील मोटार सायकल घेवून दरोडेखोर हे वेल्हे तालुक्यातील सिगापुर डोंगरात जंगलाकडे गेल्या असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांकडील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजचे आधारे गोपनीय बातमीदार सतर्क करण्यात आला असता, पथकातील स्थानिक. गु.शा.चे पो.हवा.अमोल शेडगे यांना गोपनीय वातमीदाराकडून बातमी मिळाली की, गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा अंकुश दगडू कचरे रा.सिगापूर मोहरी,पो. चरोती, ता.बेल्हे जि.पुणे हा असून त्याने त्याच्या इतर साथीदाराचे मदतीने गुन्हा केला आहे. मिळालेल्या माहितीची खात्री करून दि. २८ डिसेंबर रोजी आरोपी १) अंकुश दगडु कचरे (वय २० वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, सध्या रा.जैन मंदिराजवळ, साईनगर कात्रज, पुणे, मूळ रा. सिगापूर मोहरी, पो.वरोती, ता. वेल्हे जि. पुणे) २) गणेश भांव कचरे (वय २३ वर्षे, रा.जैन मंदिर, वाघजाईनगर कात्रज, पुणे, मुळ रा. हारपूड, पो.वरोती, ता.वेल्हे जि.पुणे) यांना सिगापूर डोंगरातील जंगलातून ताब्यात घेण्यात आले, सदर आरोपीकडे चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे इतर साथीदार तीन विधीसंघषित बालक यांच्या मदतीने सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना विश्वासात घेवून तपास केला असता, त्यांचेकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता व ५६ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा ७० लाख ३२ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना मा.न्यायालयात हजर केले असता दि.५ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे. यातील मुख्य आरोपी अंकुश दगडू कचरे बाचेवर याच्या विरोधात एकूण ३ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगीरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पो.नि. वैशाली पाटील हवेली पोस्टें, स.पो.नि. किशोर शेवते वेल्हे.पो स्टे. स्था.गु.शा.चे स.पो.नि. महादेव शेलार, स.पो.नि. दत्ताजीराव मोहिते, पोलीस सब इन्स्पेक्टर हनुमंत पासलकर, हयेलो पो स्टेशनचे पोसई शितल ठेवे, पोसई संजय सुतनासे, पोसई सुभाष गिरे, पोसई दिलीपराव शिंदे, पोलीस अंमलदार रामदास बाचर, अमोल शेडगे, मंगेश बिगळे, मंगेश भगत, तुपार भोईटे, सागर नामदास, गणेश धनये, संतोष तोडकर, संतोष भापकर, युवराज सोमवंशी, राजू मोमीण, योगेश नागरगोजे, राहुल पवार, दिपक साबळे, संदिप वारे, भारत मोहोळ, अतुल डेरे, अक्षय नवले, सचिन गुंड, दिपक गायकवाड, चालक बाळासाहेब पुंड, चालक अजय दंडे, विजय मारणे, अशोक तारू, अजय पाटसकर, समाधान चोरमले, ऋषिकेश गायकवाड, अनिकेत काळे, स्वप्निल साळुंखे, प्रशांत दरेकर, रमेश फडतरे, विजय कांवळे, चालक दिलोप आंबेकर राजेंद्र आवदे, रोहित मरभळ, आकाश पाटील, चालक सोमनाथ जाधव, स्वप्निल साळुंखे, निलम निकम, स्नेहल कामटे, पोलीस पाटील गणेश सपकाळ होमगार्ड विजय कटके यांनी केली आहे.




