spot_img

Jamie Lever :  ट्रोलिंगला वैतागून जेमी लीव्हरचा मोठा निर्णय; सोशल मीडियापासून घेतला ब्रेक

spot_img

तान्या मित्तलच्या मिमिक्रीनंतर झालेल्या टीकेमुळे जेमीचा भावनिक खुलासा, चाहत्यांना दिला संदेश

प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हर यांची कन्या जेमी लीव्हर (Jamie Lever) ही वडिलांप्रमाणेच तिच्या कॉमेडी, मिमिक्री आणि अभिनयासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात आणि तिचा चाहतावर्गही मोठा आहे. मात्र अलीकडे तिने केलेल्या एका मिमिक्रीमुळे जेमी अडचणीत सापडली.

जेमीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये तिने तान्या मित्तलची (Taniya Mittal) नक्कल केली होती. तिचा अभिनय इतका प्रभावी होता की अनेकांना तो खरा वाटला. मात्र, हा व्हिडिओ तान्या मित्तलच्या चाहत्यांना अजिबात पसंत पडला नाही. त्यानंतर जेमीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

या सततच्या टीकेला वैतागून अखेर जेमी लीव्हरने सोशल मीडियापासून काही काळासाठी दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या लांबलचक पोस्टमध्ये तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. “माझं काम मी मनापासून आणि प्रामाणिकपणे करते, हे मला जवळून ओळखणाऱ्यांना माहीत आहे,” असं तिने लिहिलं.

पुढे ती म्हणाली की, लोकांना हसवण्याची संधी मिळाल्याबद्दल ती कायम देवाची ऋणी आहे. मात्र या प्रवासात प्रत्येकजण आपल्यावर खुश असेलच असं नाही, हेही तिला उमगलं आहे. “सगळे टाळ्या वाजवत नाहीत आणि सगळे तुमच्यासोबत हसतही नाहीत,” असं तिने नमूद केलं.

अलीकडच्या घडामोडींमुळे आपण स्वतःचा एक भाग हरवल्यासारखं वाटत असल्याचं सांगत, हा निर्णय रागातून नाही तर आत्मचिंतनातून घेतल्याचं जेमीने स्पष्ट केलं. “मला माझं काम खूप आवडतं आणि मी लोकांचं मनोरंजन करत राहीन. मात्र सध्या मला थोडा ब्रेक घ्यायचा आहे. पुढच्या वर्षी पुन्हा भेटूया,” असा भावनिक संदेश तिने चाहत्यांना दिला. जेमीच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, अनेकांनी तिला पाठिंबा देत लवकर परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ