15 वर्षांनंतर धडाकेबाज कमबॅक!
तब्बल 15 वर्षांनंतर 3 इडीयट्स या सिनेमाचा सिक्वेल बनणार असल्याची मोठी खुशखबर समोर आली आहे. अमीर खान करीना कपूर आर माधवन आणि शर्मन जोशी पुन्हा एकदा एकत्र दिसणारा सून राजकुमार हिराणी दिग्दर्शित ही फिल्म 2026 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अर्थात पहिल्या भागाचा नॉस्टॅल्जिया आणि नवी कथा या दोन्हींचा मिलाफ या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. पंधरा वर्षांपूर्वी प्रेक्षकांना ऑल इज वेल म्हणायला लावणारे आयकॉनिक फिल्म थ्री इडियट्स आजही चाहत्यांच्या मनात आहे. या फिल्मचा सिक्वेल बनणार असल्याने फॅन्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या कथेला पुन्हा पुढे नेण्याचा निर्णय मेकर्सनी घेतला असून थ्री इडीयट्स चा सिक्युल येणार असल्याच्या अपडेटने सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत.
थ्री इडीयट्सच्या (3 idiots) दुसऱ्या भागातही मूळ स्टारकास्ट परतणार आहे. आमिर खान (Aamir Khan), करीना कपूर, आर माधवन आणि शर्मन जोशी पुन्हा एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचा दिग्दर्शन पुन्हा राजकुमार हिराणी करत असून निर्मिती विधु-विनोद चोप्रा राजकुमार हिराणी आणि आमिर खान यांची असणार आहे. पिंक वेलाने दिलेल्या माहितीनुसार 15 वर्षांनंतर हा बहुप्रतीक्षित सिक्वेल आकार घेत आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट लॉक झाली असून टिमही उत्साहात असल्याचं सांगितलं जातंय. असंही कळतंय की आमिर खान आणि राजकुमार हिरानी यांनी दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकला सध्या थोडासा ब्रेक दिलं आहे. कारण स्क्रिप्ट त्यांच्या अपेक्षेप्रमाणे तयार झाली नसल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे त्यांनी सध्या ‘3 इडियट्स 2’लाच प्राधान्य दिलं आहे.




