spot_img

Maha Vikas Aghadi : हिवाळी अधिवेशनाला सुरुवात; विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीत नवी खळबळ

spot_img

ठाकरे गटाचा आग्रह कायम; आदित्य ठाकरे यांच्या नावाची अचानक चर्चा मात्र स्वतः त्यांनी अफवा फेटाळली

महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची आज धमाकेदार सुरुवात झाली. जनतेच्या नागरी प्रश्नांवर चर्चा व्हावी अशी अपेक्षा असताना, पहिल्याच दिवशी लक्ष गेले ते विरोधी पक्षनेतेपदाच्या रस्सीखेचीत. महाविकास आघाडीत या पदासाठी कोणाला संधी मिळणार यावरून मोठी हालचाल सुरू आहे.

महाविकास आघाडीकडे एकूण 46 आमदार आहेत, त्यातील सर्वाधिक म्हणजे 20 आमदार उद्धव ठाकरे गटाचे. त्यामुळे ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेतेपद मिळावे यासाठी जोरदार मागणी केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून भास्कर जाधव यांचे नाव या पदासाठी आघाडीवर होते.

मात्र, आज अचानक आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे नाव चर्चेत येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. उद्धव ठाकरे स्वतः या पदासाठी आदित्यच्या नावावर मतं घुसळत आहेत, आणि यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण आदित्य ठाकरे यांनी हे वृत्त पूर्णपणे नाकारले. “ही फक्त अफवा आहे, विश्वास ठेवू नका,” असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

यावर कुडाळचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी टोला लगावला. “ते काय ज्योतिषी आहेत का? त्यांच्याकडे उरलेच किती—20 आमदार! नको त्या विषयात बोलू नये,” अशी टीका राणेंनी केली.

प्रत्यक्षात 288 सदस्यांच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करण्यासाठी 29 आमदारांची किमान संख्या आवश्यक आहे. महाविकास आघाडीकडे एकत्रितपणे 46 आमदार आहेत. ठाकरे गट 20, काँग्रेस 16 आणि शरद पवार गटाचे 10. मात्र आघाडीतील कुठल्याही एका पक्षाकडे स्वतंत्रपणे 29 जागा नसल्याने विरोधी पक्षनेतेपद सध्या रिक्तच आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ