spot_img

Suraj Chavan Wedding : सुरज चव्हाण-संजना गोफणे यांचा शाही विवाहसोहळा लवकरच होणार लग्नपत्रिकेतील खास पाहुण्यांच्या यादीने वाढवली उत्सुकता

spot_img

बिग बॉस मराठी 5 विजेता सुरज नव्या आयुष्याच्या उंबरठ्यावर; 29 नोव्हेंबरला 6.11 वाजता विवाह, साखरपुड्यापासून हळदीपर्यंत सर्व विधींना चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये विजेतेपद पटकावत घराघरात लोकप्रिय ठरलेला आणि सोशल मीडियावर लाखोंची मने जिंकणारा रील स्टार सुरज चव्हाण (Suraj Chavan) आता आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. संजना गोफणे (San̄janā gōphaṇē) हिच्यासोबत त्याचा विवाह उद्या, म्हणजेच शनिवार, 29 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून संध्याकाळी 6.11 वाजता शुभमुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.

लग्नापूर्वीचे सर्व पारंपारिक विधी देखील धुमधडाक्यात सुरू झाले आहेत. सकाळी साखरपुडा, त्यानंतर हळद आणि याआधी संजनाच्या हातावर सुरजच्या नावाची रेखीव मेहंदी रंगल्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. झपाट्याने चर्चेत असलेल्या या सोहळ्यामुळे चाहत्यांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

यात भर म्हणून आता सुरज-संजनाच्या लग्नपत्रिकेची यादी समोर आली असून कोणकोण सेलिब्रिटी, कलाकार, राजकीय नेते आणि दिग्गज पाहुणे उपस्थित राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज नावांनी सजलेली ही पाहुण्यांची यादी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे एका नावामुळे तर चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली असून या भव्य विवाहसोहळ्याची प्रतीक्षा आता शिगेला पोहोचली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ