spot_img

Gondia Election blunder : गोंदिया प्रचारसभेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पतीचे वक्तव्य व्हायरल कमळाचं बटन दाबा अन्…

spot_img

गोंदिया नगर परिषद निवडणुकीचा माहोल तापला असून सर्वच पक्ष निवडणूक प्रचारात आक्रमक झाले आहेत. याच प्रचारसभांदरम्यान कधी कधी नव्या गम्मती घडतात आणि वक्तव्यांचे फटाकेही फुटतात. असाच एक मजेशीर पण चर्चेत राहणारा प्रकार गोंदियातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत घडला.

गोंदियाच्या 6 नंबर वॉर्डातील प्रचारसभेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे पती खलील पठाण भाषण करत होते. बोलता बोलता त्यांच्या तोंडून अनावधानाने एक वाक्य निघालं “कमळ चिन्हावर बटन दाबून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करा.”

हे ऐकताच कार्यकर्ते आणि नागरिक दोघांचेही कान टवकारले. कारण ‘कमळ’ हे चिन्ह भाजपचे! चूक लक्षात येताच खलील पठाण यांनी तातडीने माफी मागितली आणि हे केवळ बोलण्यातून झालेलं घसरलेलं वाक्य असल्याचं स्पष्ट केलं.

पण तोपर्यंत ही ‘चूक’ अनेकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली होती. काही क्षणांतच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विशेष म्हणजे या सभेच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते व खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) उपस्थित होते, त्यामुळे या प्रसंगाची चर्चा आणखी जोर धरू लागली. सध्या हा व्हिडीओ गोंदिया जिल्ह्यात भरपूर शेअर केला जात असून निवडणूक वातावरणात या गोंधळाची जोरदार चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ