spot_img

Gauri Garje Case : गाैरी गर्जे आत्महत्या प्रकरणात अंजली दमानियांचे पंकजा मुंडेंवर थेट सवाल मग तुम्ही तिथे …

spot_img

अनंत गर्जेवर गंभीर आरोप; अंत्यविधीपासून पोलिस तपासापर्यंत राजकारणाचे सावट असल्याचा दमानियांचा आरोप

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या पीए अनंत गर्जे (Anand Garje) यांच्या पत्नी गौरी पालवे–गर्जेच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांनी केलेल्या आरोपांमुळे प्रकरण चांगलेच तापले आहे. गौरीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की आत्महत्येच्या वेळी अनंत घरी उपस्थित होता. मात्र अनंत गर्जे यांनी स्वतः मात्र हे स्पष्ट केले की ते घरी नसताना गौरीने दरवाजा बंद करून आत्महत्या केली आणि ते 31 व्या मजल्यावरून खाली त्यांच्या 30 व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आले तेव्हा त्यांना ही घटना समजली. त्यांनी त्वरित तिला रुग्णालयात नेल्याचाही दावा केला.

कुटुंबियांचा आरोप आहे की गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये वाद वाढले होते आणि गौरीवर अत्याचारही होत होते. तिने अनेक गोष्टी आपल्या नातेवाईकांना सांगितल्या होत्या तसेच काही पुरावेही पाठवले होते.

या प्रकरणावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी मोठे भाष्य करत अनंत गर्जेला अटक होत असल्याची माहिती दिली. गौरीच्या गावातून सतत फोन येत असल्याचे सांगत त्यांनी अंत्यविधीच्या वेळी झालेल्या ‘तमाश्या’वर नाराजी व्यक्त केली. कुटुंबियांनी सुरुवातीला अंत्यविधी अनंत गर्जेच्या घरासमोर करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र नंतर दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या बाचाबाचीमुळे तो थोड्या अंतरावर पार पडला. दमानिया यांनी सांगितले की या संपूर्ण प्रक्रियेत राजकारण उघडपणे दिसत आहे. पोलिस स्टेशनमध्येही ‘सेटलमेंट’ची भाषा होत असल्याचे त्यांनी ऐकले आणि यामुळे त्यांना तीव्र संताप आला.

पंकजा मुंडे यांचे नाव या प्रकरणात जोडले जात असल्याने दमानियांनी थेट प्रश्न उपस्थित केले. पंकजा मुंडेंना घटना कळूनही त्यांनी गौरीच्या कुटुंबीयांना तातडीने मदत का केली नाही, पोलिस स्टेशन किंवा हॉस्पिटलमध्ये त्या का गेल्या नाहीत, असा सवाल त्यांनी केला. “ज्याला तुम्ही पुत्रवत मानता, त्याची पत्नी मृत्यूमुखी पडली, मग तुम्ही तिथे का नव्हतात?” असा थेट प्रश्न दमानियांनी विचारला. या प्रकरणात आरोप–प्रत्यारोप, राजकारण आणि तपास प्रक्रियेवर पर्यंत अनेक प्रश्न उपस्थित होत असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ