spot_img

Nilesh Rane On BJP : नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर निलेश राणेंचा भाजपावर थेट निशाणा; राणे विरुद्ध राणे प्रतिष्ठेची लढत तापली

spot_img

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं पडघम वाजताच राज्यातील राजकारणात आरोप–प्रत्यारोपांची फैऱ्या सुरू झाल्या आहेत. महायुतीतील अनेक निवडणूक क्षेत्रांतून मतभेद उफाळून येत असल्याचं चित्र आहे. त्यातच सिंधुदुर्गमधील कणकवली नगरपंचायत निवडणूक तर चांगलीच गाजतेय.

येथे शिवसेना (शिंदे गट) चे आमदार निलेश राणे यांनी भाजपावर गंभीर आरोप करत वातावरण पेटवलं आहे. कणकवलीतील एका प्रभागात 169 मतदार कृत्रिमरीत्या वाढवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उमेदवार समीर नलावडे यांच्या घर क्रमांक 389 मध्ये नसतानाही तीन मुस्लिम व्यक्ती राहतात अशी नोंद असल्याचा दावा त्यांनी केला. यासंबंधी सर्व पुरावे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केल्याचं निलेश राणेंनी सोशल मीडियावरही पोस्ट केलं आहे.

दरम्यान, कणकवली नगरपरिषद निवडणुकीत आता राणे विरुद्ध राणे अशी थेट प्रतिष्ठेची लढत रंगली आहे. भाजप–अजित पवार राष्ट्रवादी एकीकडे तर शिंदे शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी अशा अनोख्या युतीने ‘शहर विकास आघाडी’ तयार केली आहे. यामुळं भाजपच्या मंत्री नितेश राणे आणि शिंदे गटाचे निलेश राणे समोरासमोर येत राजकीय वातावरण भडकले आहे. कणकवलीतील या संघर्षाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ