spot_img

Shruti Marathe : नेल आर्ट वाचवायला श्रुतीने घातले ग्लोव्हज? जेवणाच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ

spot_img

गौरवने ‘नेल जॉब’ची मजा घेत शेअर केला व्हिडीओ, चाहते म्हणतात – “कलियुगात अजून काय काय पाहायला मिळणार?”

मोठ्या पडद्यावर असो की टीव्हीवर आपल्या आवडत्या कलाकारांचे वैयक्तिक क्षण पाहायला प्रेक्षक कायम उत्सुक! सोशल मीडियाने तर ही उत्सुकताच दुप्पट केली आहे. मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marathe) आणि तिचे पती गौरव घाटणेकर (Gaurav Ghatenkar) हे दोघेही इंटरनेटवर नेहमी चर्चेत असतात. प्रेमळ पोस्ट्स, मजेदार व्हिडीओ आणि सतत फॅन्सशी जोडलेले राहणे यामुळे त्यांच्या जोडीचे चाहतेही प्रचंड आहेत.

असाच एक भन्नाट व्हिडीओ गौरवने नुकताच शेअर केला आणि सगळ्यांनाच हसवून सोडलं. व्हिडीओमध्ये श्रुती शांतपणे जेवत असते… पण हातात ग्लोव्हज! होय, भेंडी-भाकरी खाताना अभिनेत्रीने नेल्स खराब होऊ नयेत म्हणून हातात ग्लोव्हज घातले होते! आणि गौरव त्यावर निवांत कॉमेंट्री करत म्हणतो. “आजच नेल जॉब करून आली. भेंडीची भाजी आहे, हळद लागली तर सगळं वाया जाईल… म्हणून ग्लोव्हज!” या मजेशीर प्रकारावर सोशल मीडियात अक्षरशः कमेंट्सचा पाऊस सुरू झाला. कुणीतरी सुचवलं – “मॅडम, आमटीसाठी स्ट्रॉ वापरा!” 😆 कुणी चिमटा काढला – “रबरी भेंडी जबरी भेंडी!” तर कुणाचा प्रश्न – “कलियुगात अजून काय काय बघायला मिळणार?” हा साऱ्याचा आनंद घेणारी श्रुतीही मागे राहिली नाही. तिने स्वतःच पतीला प्रश्न केला – “श्रुती ताई म्हणजे काय? आणि नेल जॉब म्हणजे कुठलं शास्त्र?” एका युजरने तर थेट खेळकर टोला मारला “सचिन पिळगांवकरची बहीण!”

एकंदरीत, छोट्या प्रसंगावरून मोठं मनोरंजन घडवण्यात या स्टार कपलला खरोखर तोड नाही. आता पुढे श्रुती काय भन्नाट करणार ते पाहायला फॅन्स उत्सुक आहेतच!

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ