spot_img

Sanjay Raut : बिहार निकालावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

spot_img

निवडणूक आयोग भाजपच्या ‘युती’ची टीका; दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार

बिहार विधानसभा निवडणुकीचे (Bihar Election) निकाल समोर येत असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सध्या प्रकृती बिघडल्यामुळे राऊत रुग्णालयात उपचार घेत आहेत. डॉक्टरांनी त्यांना दोन महिन्यांची कडक विश्रांती सुचवली असून, त्यामुळे त्यांच्या दैनंदिन पत्रकार परिषदा बंद आहेत. “दोन महिन्यांनी पुन्हा पूर्ण तंदुरुस्त होऊन सार्वजनिक जीवनात परत येईन,” असे राऊत यांनी सांगितले.

बिहारच्या निकालाबाबत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. “या निकालाने धक्का बसण्यासारखे काही नाही. निवडणूक आयोग आणि भाजप एकत्र काम करत असल्याचे चित्र मागील काही काळापासून दिसत आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा वेगळा निकाल लागणे शक्यच नव्हते. महाराष्ट्रात जसा ‘पॅटर्न’ दिसला, तसाच प्रकार बिहारमध्येही झाला. ज्या महाआघाडीबद्दल सत्तेत येण्याची खात्री होती, त्यांना ५० च्याही आत ठेवण्यात आलं,” असा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या मागील वर्षीच्या एका बाजूच्या निकालाची आठवण त्यांनी करून दिली. त्या वेळी महायुतीने प्रचंड बहुमत मिळवले होते, तर महाविकास आघाडी केवळ 46 जागांवर थांबली होती.

बिहारमध्येही जवळपास असेच चित्र दिसत आहे. भाजप नेतृत्वाखालील एनडीए 195 जागांवर आघाडीवर असून, भाजप 90, जेडीयू 81, एलजेपी 20 आणि एचएएम 4 जागांवर पुढे आहे. तर लालू प्रसाद यादव यांच्या राजदला 28, काँग्रेसला 5 आणि डाव्या पक्षांना 4 जागांवर आघाडी मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ