“गरीबीवर मात करून बिग बॉसपर्यंतचा प्रवास केलेल्या सूरजची जीवनसाथी संजना; तयारीत सोशल मीडियावर उत्सुकता”
‘झापुक झुपूक’ म्हटलं की सर्वात आधी आठवतो तो म्हणजे बिग बॉस मराठीचा ताज्या सीझनचा लाडका विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan). साधेपणा, शांत स्वभाव आणि प्रचंड स्ट्रगल यामुळे घराघरात लोकप्रिय झालेल्या सूरजने बिग बॉसच्या (BiggBoss) घरात फक्त एक चप्पल आणि दोन जोडी कपड्यांसह प्रवेश केला होता. पण त्याने आपल्या स्वभावाने आणि खेळाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली.
लहान वयात आई-वडिलांचा आधार हरवलेल्या सूरजने आयुष्यात मोठी गरीबी पाहिली. मिळेल ते काम करून जगलेला सूरज आज सोशल मीडियावर एक सुपरस्टार आहे. आणखी खास म्हणजे, त्याची लग्नाची धामधूम आता सर्वत्र चर्चेत आहे.
सूरजने शोमध्ये अनेकदा आपल्या होणाऱ्या पत्नीबद्दल बोलले होते. त्याच्या मनासारखीच मुलगी त्याला भेटली संजना. नुकतेच सूरजची मैत्रीण आणि बिग बॉस कंटेस्टंट अंकिता वालावलकर (Ankita Valavalkar) हिने सूरज आणि संजनाला (Sanjana) केळवणासाठी निमंत्रण दिले होते.
लग्नाच्या तयारीला सुरुवात करत सूरज ठाण्यात जाऊन पत्नीकरिता सोन्याचे दागिनेही खरेदी करताना दिसला. संजना आरशात दागिने घालून बघताना तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर गाजत आहेत. अंकिता देखील खरेदीत दोघांना मदत करताना दिसली.
सध्या सूरज चव्हाणच्या घरी लगीनघाईचे वातावरण असून त्याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. साधेपणा, संघर्ष आणि यश या तिघांच्या मिश्रणातून घडलेल्या सूरजच्या आयुष्यातील हा नवा अध्याय चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे.




