spot_img

Pune Land Scam : पुण्यातील जमीन प्रकरणात खळबळ, पार्थ पवारांना क्लीनचिट? चौकशीवरून नवे प्रश्न उपस्थित

spot_img

मुद्रांक शुल्क फसवणूक प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल; पार्थ पवारांचे नाव तक्रारीत नसल्याने राजकीय वर्तुळात संशय

पुण्यातील मोलाच्या जमिनीच्या खरेदी व्यवहारावरून राज्याच्या राजकारणात मोठे तापमान निर्माण झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या अमेडिया कंपनीला तब्बल 300 कोटी रुपयांत मिळालेली जमीन प्रत्यक्षात 1800 कोटी रुपयांची असल्याचा आरोप करण्यात येतोय. या व्यवहारात केवळ 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क भरल्याचे समोर आल्यानंतर वाद आणखी चिघळला आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले असून, शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रविंद्र तारु या तिघांवर मुद्रांक शुल्क फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कंपनीतील भागीदार असलेल्या पार्थ पवारांवर कोणतीही तक्रार दाखल नसल्याने राजकीय वर्तुळात क्लीनचिटचा प्रश्न उपस्थित होतोय.

अमेडिया कंपनीत दिग्विजय पाटील हे पार्थ पवारांचे भागीदार असून, त्यांच्याकडे 1% शेअर्स असल्याचे बोलले जाते. त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही पार्थ पवारांचे नाव तक्रारीत नसल्याने शंका वाढत आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की ज्यांची नावे दस्तावर आहेत आणि ज्यांच्या सह्या आहेत त्यांच्याविरुद्धच तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, या व्यवहारात महत्त्वाची भूमिका असलेल्या शीतल तेजवानीचा बावधन पोलिसांकडून शोध सुरू आहे. तिने व्यवहारात वापरलेला पत्ता सध्या बंद असल्याने पोलिसांना अडचणी येत आहेत. शीतल तेजवानी सापडल्यानंतर या प्रकरणातील पार्थ पवारांची भूमिकाही स्पष्ट होण्याची शक्यता मानली जाते. राजकीय दबाव, अब्जावधींचा जमिन व्यवहार आणि आरोप-प्रत्यारोप यामुळे हे प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणातील हॉट टॉपिक ठरले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ