हरियाणा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत मोठा गोंधळ झाल्याचे आरोप
काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत मतचोरीचा आरोप आज काही गौप्यस्फोट केले. राहुल गांधी यांनी आज हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेत मोठा गोंधळ झाला असल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी आरोप केल्यानंतर काही वेळेतच केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले मुद्दे पुढीलप्रमाणे –
- निवडणुकीसाठी 02 ऑगस्ट 2024 रोजी मसुदा मतदार यादी (Draft Voter List) प्रकाशित करण्यात आली आणि सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसोबत शेअर करण्यात आली.
- SSR दरम्यान प्राप्त झालेल्या दावा आणि आक्षेपांची एकूण संख्या 4,16,408 होती.
- BLO ची एकूण संख्या: 20,629
- अंतिम मतदार यादी 27 ऑगस्ट 2024 रोजी प्रकाशित करण्यात आली आणि सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसोबत शेअर करण्यात आली.
- जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे ERO विरुद्ध दाखल केलेल्या अपीलांची संख्या: 0
- जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशांविरुद्ध CEO कडे दाखल केलेल्या दुसऱ्या अपीलांची संख्या: 0
- उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत मतदार यादी अंतिम करण्यात आली आणि 16 सप्टेंबर 2024 रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसोबत शेअर करण्यात आली.
- मतदान केंद्रांची (Polling Booths) एकूण संख्या: 20,632
- निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची (Candidates) एकूण संख्या: 1,031
- सर्व उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतदान प्रतिनिधींची एकूण संख्या: 86,790
- मतदानाच्या दुसऱ्या दिवशी तपासणीदरम्यान उमेदवारांनी नोंदवलेल्या आक्षेपांची संख्या: 0
- मतमोजणीसाठी सर्व उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींची संख्या: 10,180
- मतमोजणीदरम्यान Returning Officer ला प्राप्त झालेल्या तक्रारींची संख्या: 5
- निकाल 8 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित करण्यात आला.
- निवडणुकीला आव्हान देण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकांची संख्या: 23




