बॉलिवूडची ‘ट्रॅजेडी क्वीन’ (Tragedy Queen) म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मीना कुमारी (Meena Kumari) हिच्या आयुष्यावर आधारित एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. माहितीनुसार,असं म्हणत आहेत, सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्रा हा सिनेमा बनवणार असून या सिनेमात मीना कुमारींच्या मुख्य भूमिकेत नक्की कोण दिसणार? याबद्दल लोकांमध्ये चर्चा सुरु आहे. दरम्यान, या सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्री क्रिती सेनन (kriti sanon)आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) दोन्ही पैकी कोणी तरी एक जण यात दिसणार आहे अशी संभवतात वर्तवली जाते. या दोघींपैकी नेमकं सिनेमात मीना कुमारींच पात्र कोण साकारणार? यावर अजूनही प्रश्न चिन्ह आहे.
माहितीनुसार, मीना कुमारींच्या बायोपिकसाठी अभिनेत्री कियारा अडवाणीने बाजी मारली असून अभिनेत्री क्रिती सेननचा पत्ता कट केला आहे.‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी मीना कुमारी यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच कियारा अडवाणीने लेकीला जन्म दिला असून आई झाल्यानंतर तिने पहिला सिनेमा मीना कुमारींचा बायोपिक साईन केला होता. अद्याप कियाराने याविषयी अधिकृतपणे माहिती दिलेली नाही.
रिपोर्टनुसार असं सांगितलं जात आहे कि, या सिनेमाचे निर्माते बिलाल अमरोही आहेत. याशिवाय सिनेमामध्ये मीना कुमारी आणि त्यांचे पती कमल अमरोही यांची कहाणी दाखवण्यात येणार आहे. या भूमिकेसाठी सुरुवातीला क्रिती सेननची निवड होणार अशी चर्चा होती. मात्र, कियाराचा चार्म आणि भावनिक सौंदर्य हे पडद्यावर मीना कुमारी दर्शवण्यास कमी पडेल, असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. त्याबरोबरच ते असेही म्हणतात की, या भूमिकेसाठी कियारा प्रचंड उत्सुक असून तिने पात्राची पूर्वतयारी घरच्या घरी सुरू केली आहे आणि या पात्राची गरज म्हणून ती ऊर्दू भाषादेखील शिकत असल्याचे म्हटले जात आहे.




