Subodh Bhave : सुबोध भावेचा चित्रपटसृष्टीमध्ये रौप्यमहोत्सवी, २५ केलं मनोरंजनविश्वात काम

spot_img

बाजीराव ते समरपर्यंत; १०० चित्रपट, नाटकं, मालिका अन् प्रेक्षकप्रेमाची अनमोल साथ

मराठी मनोरंजनाच्या आसमंतात अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अशा त्रिवेणी संगमाने स्वतःची अनोखी जादू पसरवणारा सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी व्यावसायिक कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण केली. झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मधील समरच्या भूमिकेने सध्या घराघरात वाहवा मिळवणाऱ्या सुबोधने फेसबुकवरून या रौप्यमहोत्सवाचा भावुक वेध घेतला.

२००० च्या नोव्हेंबरात ‘पेशवाई’ (Peshwai) मधील बाजीराव पेशव्यांची पहिली व्यावसायिक भूमिका ही त्यांच्या प्रवासाची सुरुवात ठरली. त्याच आठवणींना उजाळा देत त्याने सहकारी, निर्माते, लेखक आणि सर्वांत महत्त्वाचे प्रेक्षकांचे मन:पूर्वक आभार मानले.”‘गीतरामायण’ (Geetramayana) मध्ये श्रीरामांचे क्षणिक दर्शन होते, पण खरी सुरुवात स्मिता तळवलकरांच्या निर्मिती आणि संजय सूरकरांच्या दिग्दर्शनातील बाजीरावांपासून,” असे सांगत सुबोधने लिहिले. १० ते १५ व्यावसायिक नाटके, ३५ हून अधिक मालिका, मराठी-हिंदी वेबसीरिज, जाहिराती आणि मराठी, हिंदी, बंगाली, मल्याळम भाषांमधील एकूण १०० चित्रपट हा अफाट आकडा त्याच्या अथक मेहनतीचा दाखला आहे.

‘कट्यार काळजात घुसली’, ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’, ‘तुकाराम’ अशा मैलाच्या दगडांपासून ते नाट्यरंगभूमीपर्यंत सर्वत्र त्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.”हजारो व्यक्तिरेखा अजून वाट पाहतायत, पुढचा टप्पा आणखी रंजक असेल,” असे ठाम सांगत सुबोधने कृतज्ञता व्यक्त केली. पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी असं म्हंटल आहे की, “सुबोध, तुझ्याकडून अजून अनेक कथा ऐकायच्या आहेत!” मराठी वाहिन्या, पडद्यामागचे-समोरचे सहकारी आणि रसिक प्रेक्षकांच्या प्रेमानेच हा कलासोहळा खुलला, असे त्याचे मत. सुबोधच्या या रौप्यजयंतीने मराठी मनोरंजनविश्वाला नव्या ऊर्जेचा संचार केला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ