अभिनेता सलमान खान (Salaman Khan) ज्याला बॉलिवूडचा (Bollywood )‘दबंग’ खान म्हणून ओळखला जातो. त्याचा चाहता वर्ग फक्त भारतातच नाही तर, सातासमुद्रा पार देखील फार मोठी आहे. सलमान खान याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. त्याचा आगामी चित्रप असो नाहीतर शो चाहते नेहमी त्याला हजेरी लावतात, पण एका देशाने सलमान खानला दहशतवादी घोषित केलं…हा देश दुसरा तिसरा कोणता नाही तर, पाकिस्तान आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद विरोधी कायद्याच्या चौथ्या यादीत सलमान खान याचं नाव टाकण्यात आलं… पण तपास केल्यानंतर यामध्ये काहीही तथ्य नसल्याची बाब आढळली आहे… सध्या सर्वत्र सलमान खान चर्चेत आहे.
या अफवांची सुरुवात एका ‘सरकारी कागदपत्रा’मुळे झाली असल्याची बाबी समोर येत आहे. या कागदपत्रांमध्ये लिहिण्यात आलं होतं की, सलमान खान याला पाकिस्तानने दहशतवाद संबंधी यादीत सामिल केलं आहे. याच्या स्क्रिनशॉटमुळे चर्चेला वेगळचं उधाण आला आहे. यासंबंधी पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाची नोटीस असल्याचा दावा करण्यात आला होता, पण ते सर्वकाही बनावट असल्याचं सत्य समोर आलं आहे.
तपास केल्यानंतर मोठं सत्य पुढे आलं, सबंधित दस्तऐवज डिजीटली तयार करण्यात आला होता… कोणत्याही सरकारी वेबसाईटवर याची पुष्टी झालेली नसल्याचं समोर आलं आहे. या शिवाय कोणत्याही अधिकाऱ्याने या प्रकरणावर मौन सोडलेलं नाही. असं असताना, सलमान खानचे बलुचिस्तानसारख्या मुद्द्यांवर चर्चा करतानाचे जुने व्हिडिओही व्हायरल झाले होते.
सलमान खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालंच तर, सलमान लवकरच ‘बॅटल ऑफ गलवान’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सैन्य अधिकाऱ्याच्या भूमिकेत सलमान खान दिसणार आहे. ईदच्या मुहूर्तावर सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने लडाखमध्ये सिनेमाची काही दिवसांपूर्वी शुटिंग पूर्ण केलं आहे. हा सिनेमा 2020 मध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमधील गलवान व्हॅलीतील संघर्षाच्या खऱ्या घटनांवर आधारित असल्याचा माहिती मिळत आहे त्याबरोबरच सध्या सलमान बिग बॉस 19 साठी देखील शुटिंग करत आहे. चाहहते त्याला चित्रपटात पाहण्यासाठीं उत्सुक आहे.




