spot_img

Gangaram Gavankar : ‘वस्त्रहरण’कर गंगाराम गवाणकर यांची प्राणज्योत मालवली !

spot_img

नाटक क्षेत्रात पाच हजारहुन अधिक प्रयोगाने लोकांचं मन जिंकणारे मालवणी बोलीभाषेतील ‘वस्त्रहरण’ (vastraharan)नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर (GAngaarm Gavankar) यांचे सोमवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गवाणकर ८६ वर्षांचे होते. वयोपरत्वे आलेल्या आजारांशी झुंजणाऱ्या गवाणकर यांच्यावर खासगी रुग्णालयात दहिसर येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

मंगळवारी, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर दहिसर येथील अंबावाडी, दौलतनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ‘वस्त्रहरण’ या एकाच नाटकाने गंगाराम गवाणकर यांनी मराठी नाट्यसृष्टीत आपले नाव कोरले. पहिल्यांदाच मालवणी भाषेतील नाटक मुख्य व्यावसायिक नाटकांच्या प्रवाहात आणून लोकप्रिय करण्याचे श्रेय गवाणकर याना दिले जाते. ‘महाभारता’तील व्यक्तिरेखा आणि कथेचा सुंदर उपयोग करून वास्तव घटनांनचे दर्शन करून देणारे ‘वस्त्रहरण’ सारखे फार्सिकल नाटक आजही तितकेच लोकप्रिय आहे. ‘वस्त्रहरण’सारखे अजरामर नाटक देणाऱ्या गवाणकर यांनी व्यंगात्मक मांडणी असलेली अनेक नाटके लिहिली.

‘वात्रट मेले’ या त्यांच्या नाटकाचे देखील दोन हजारांहून अधिक प्रयोग झाले होते. उमेदीच्या काळात खडतर संघर्ष अनुभवलेल्या गंगाराम गवाणकर यांनी एमटीएनएलमध्ये नोकरी केली आणि नाट्यलेखनाची आवडही जोपासली. सुरूवातीला बॅकस्टेजवर काम करण्यापासून ते हळूहळू नाट्यलेखक म्हणून ते नावारुपाला आले. १९७१ मध्ये त्यांनी रंगभूमीवरची आपली वाटचाल सुरू केली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ