Jana Nayakan Box Office : थलपती विजय यांच्या ‘जना नायकन’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई; दोन दिवसांत कोट्यवधींची कमाई!

spot_img

तब्बल ३० वर्षांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरलेल्या ‘जना नायकन’ने रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे

दाक्षिणात्य सुपरस्टार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांचा अत्यंत प्रतीक्षित चित्रपट ‘जना नायकन’ अखेर २३ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनेक कायदेशीर अडचणी आणि सेन्सॉर बोर्डाच्या रखडलेल्या प्रक्रियेनंतर हा चित्रपट रिलीज झाला असला, तरीही प्रेक्षकांचा याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. एच. विनोद दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दिवशी १३,०६७ शोजमधून तब्बल ४२.७० कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली. अनेक मोठ्या चित्रपटांची स्पर्धा असतानाही विजयच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे.

पहिल्या दिवशीच्या दमदार ओपनिंगनंतर चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारीदेखील बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी कायम ठेवली आहे. ट्रेड ट्रॅकरच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या दिवशी या सिनेमाने २१.१५ कोटी रुपयांचे संकलन केले आहे. यामुळे अवघ्या दोनच दिवसांत या चित्रपटाची एकूण कमाई ६३.८५ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. ३०० ते ३५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट विकेंडला किती कोटींचा टप्पा पार करतो, याकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

विजय थलपती यांच्या अभिनय कारकिर्दीतील हा अखेरचा चित्रपट असल्यामुळे चाहत्यांमध्ये याविषयी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. चित्रपटाची स्टारकास्ट आणि कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरत असून, शनिवार व रविवार या विकेंडच्या सुट्ट्यांमध्ये या चित्रपटाच्या कमाईत आणखी मोठी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ