Lifestyle : आषाढी एकादशीच्या उपवासासाठी बनवा कुरकुरीत भगर डोसे; चविष्ट आणि झटपट रेसिपी

spot_img

आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाच्या भक्तांकडून श्रद्धेने उपवास केला जातो. उपवासाच्या दिवशी नेहमीच्या साबुदाणा खिचडी किंवा वड्यांपेक्षा काहीतरी वेगळं आणि चविष्ट खायचं असेल, तर भगरचे कुरकुरीत डोसे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हे डोसे तयार करण्यासाठी दोन वाट्या भगर, सव्वा वाटी साबुदाणा, एक वाटी दही, दोन उकडलेले बटाटे, चार चमचे शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरच्या, थोडी साखर, मीठ आणि तूप किंवा तेल आवश्यक आहे.

कृतीसाठी साबुदाणा साधारण चार तास आणि भगर सुमारे एक तास भिजवून घ्यावी. त्यानंतर दोन्ही पदार्थ मिक्सरमध्ये वाटून त्यात दही, मीठ, साखर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून डोशासाठी योग्य असे पातळ मिश्रण तयार करावे. गरम तव्यावर हे मिश्रण पसरवून डोसे भाजावेत आणि कडेला तूप किंवा तेल सोडावे. दोन्ही बाजूंनी डोसे कुरकुरीत झाल्यावर ते गरमागरम सर्व्ह करावेत. शेंगदाण्याची किंवा नारळाची चटणी यासोबत हे उपवासाचे डोसे अधिक स्वादिष्ट लागतात.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ