FIFA World Cup 2026 Final : मेस्सीचा महासंग्राम! फायनलच्या ५५ मिनिटांतच ठरणार ‘गोल्डन बूट’चा राजा

spot_img

एम्बाप्पेचा मोठा धमाका; फुटबॉलच्या इतिहासातील महाविक्रमासाठी लिओनेल मेस्सीला पार पाडावी लागणार ‘ही’ ३ आव्हाने

फिफा वर्ल्डकप २०२६ च्या ऐतिहासिक जेतेपदावर कोण नाव कोरणार, याचा फैसला आता अवघ्या काही तासांतच होणार आहे. अंतिम फेरीत गतविजेता अर्जेंटीना आणि बलाढ्य स्पेन आमनेसामने ठाकणार आहेत. या महामुकाबल्यात दोन्ही संघांची ताकद तोडीस तोड असली, तरी गतविजेत्या अर्जेंटिनाचे पारडे काहीसे जड मानले जात आहे. या ऐतिहासिक सामन्यात केवळ ट्रॉफीच नाही, तर जगातील सर्वोच्च वैयक्तिक बहुमान असलेल्या ‘गोल्डन बूट’ (Golden Boot) पुरस्कारासाठी एक अभूतपूर्व थरार पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या फ्रान्स विरुद्ध इंग्लंड सामन्यात किलियन एम्बाप्पेने एका गोल असिस्टसह दोन शानदार गोल डागले आणि तो अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या पुढे निघून गेला आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यातील पहिली ५५ मिनिटे मेस्सीच्या कारकिर्दीतील सर्वात निर्णायक मिनिटे ठरणार आहेत.

सध्याच्या आकडेवारीनुसार, फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेने या विश्वचषकात १० गोल आणि ४ गोल असिस्ट नोंदवून अव्वल स्थान पटकावले आहे. अशी कामगिरी करणारा तो फुटबॉल इतिहासातील ५६ वर्षांतील पहिला आणि जगातील एकूण चौथा खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे, लिओनेल मेस्सीच्या नावावर सध्या ८ गोल आणि ४ असिस्ट आहेत. या स्थितीत एम्बाप्पेचे तगडे आव्हान मोडून काढण्यासाठी आणि गोल्डन बूटवर स्वतःचे नाव कोरण्यासाठी जादूगार मेस्सीपुढे आता तीन स्पष्ट मार्ग उरले आहेत.

यातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे मेस्सीला अंतिम सामन्याच्या पहिल्या ५५ मिनिटांच्या आत किंवा त्यापेक्षा कमी वेळात २ गोल करावे लागतील. कमी वेळेत केलेल्या गोलच्या निकषानुसार मेस्सी एम्बाप्पेला मागे टाकू शकतो. दुसरा पर्याय म्हणजे मेस्सीला थेट हॅटट्रिक (३ गोल) करावी लागेल, ज्यामुळे त्याचे एकूण ११ गोल होऊन तो थेट अव्वल स्थानी पोहोचेल. तर तिसरा मार्ग म्हणजे मेस्सीला २ गोल करण्यासोबतच १ गोल असिस्ट करावा लागेल, ज्यामुळे तो एम्बाप्पेच्या १० गोलांची बरोबरी करेल आणि असिस्टच्या बळावर गोल्डन बूटचा मानकरी ठरेल. जर मेस्सीने ही संधी गमावली, तर एम्बाप्पेला हा बहुमान मिळेल. तसे झाल्यास ला लीगा, चॅम्पियन्स लीग आणि फिफा वर्ल्डकप या तिन्ही मोठ्या स्पर्धांमध्ये ‘गोल्डन बूट’ जिंकणारा एम्बाप्पे हा जगातील एकमेव आणि पहिला खेळाडू बनून इतिहास रचेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ