Sunetra Pawar : राष्ट्रवादीत भेटीवरून नवी चर्चा; फडणवीसांसोबतच्या बैठकीची सुनेत्रा पवारांना नव्हती पूर्वकल्पना?

spot_img

राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना सध्या वेग आला असून, प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीबाबत पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांना पूर्वकल्पना नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 14 तारखेला मुंबईतील वर्षा शासकीय निवासस्थानी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, या बैठकीची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आधीपासून देण्यात आली नव्हती. तसेच पार्थ पवार यांनाही या भेटीबाबत पूर्वसूचना नसल्याचे बोलले जात आहे.

भेटीनंतर निर्माण झालेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी स्वतः सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क साधून बैठकीचा उद्देश आणि त्यामागील भूमिका स्पष्ट केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर देवगिरी शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांची उपस्थिती होती. बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक आणि राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात आली. याचवेळी तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीमागील कारणे आणि त्या चर्चेचा संदर्भ सुनेत्रा पवार यांच्यासमोर स्पष्ट केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मात्र, या भेटीत नेमकी कोणती राजकीय चर्चा झाली, भविष्यात त्यातून कोणते निर्णय किंवा घडामोडी घडू शकतात, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा संबंधित नेत्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे बारकाईने लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ