Jalgaon Crime : जळगावात काळजाचा ठाव घेणारी घटना; साडेतीन वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू, पती आणि सासूविरुद्ध गुन्हा

spot_img

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. किनगाव येथे एका दृष्टिबाधित महिलेने आपल्या पती आणि सासूवर तिला तसेच तिच्या साडेतीन वर्षीय मुलाला विहिरीत ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेत मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर आईने प्रसंगावधान राखत विहिरीतील लाकडाचा आधार घेत स्वतःचा जीव वाचवला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, गावकऱ्यांनी महिलेला सुखरूप बाहेर काढले, मात्र चिमुकल्याला वाचवणे शक्य झाले नाही.

प्राथमिक तपासात ही घटना अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, उपचारानंतर महिलेची प्रकृती स्थिर झाल्यावर तिने पोलिसांसमोर धक्कादायक माहिती दिली. तिच्या म्हणण्यानुसार, विहिरीच्या पूजेसाठी गेलेल्या वेळी सासूने मागून धक्का देत तिला आणि मुलाला विहिरीत ढकलले, तर या संपूर्ण प्रकारात पतीचाही सहभाग होता. तपासादरम्यान कुटुंबातील वादाचे कारणही समोर आले आहे. महिलेच्या गर्भधारणेदरम्यान डॉक्टरांनी बाळालाही दृष्टिदोष असण्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता. मात्र, तिने गर्भपातास नकार देत बाळाला जन्म दिला. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये दीर्घकाळ वाद सुरू असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ