Maharashtra : महाराष्ट्र ATSची राज्यभर मोठी कारवाई, मुंबईसह सात शहरांत एकाचवेळी धाडी

spot_img

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) राज्यभर व्यापक कारवाई करत अनेक शहरांमध्ये एकाचवेळी धाडसत्र राबवले आहे. पाकिस्तानस्थित गँगस्टर शेहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून कथित संबंध असल्याच्या संशयावरून ही मोहीम हाती घेण्यात आली असून, या प्रकरणाच्या तपासाला आता अधिक वेग आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा रोड, सांगली, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान संशयितांच्या घरांची झडती घेण्यासोबतच त्यांचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणांची तपासणी करण्यात येत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील संपर्क, चॅट्स, पोस्ट, फॉलोअर्स, आर्थिक व्यवहार आणि इतर डिजिटल माहितीची सखोल छाननी केली जात असल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या तपासात १०० हून अधिक व्यक्ती ATSच्या रडारवर असून, त्यांच्या ऑनलाइन हालचाली आणि परदेशातील संपर्कांबाबत तपशील गोळा केला जात आहे. संबंधित व्यक्तींचे सोशल मीडिया नेटवर्क आणि त्यातून कोणत्याही बेकायदेशीर किंवा राष्ट्रविरोधी कारवायांना मदत झाली का, याचाही तपास सुरू आहे. तपास यंत्रणा प्रत्येक डिजिटल पुराव्याची बारकाईने पडताळणी करत असून, आवश्यकतेनुसार संबंधितांची चौकशीही केली जाणार आहे.

या समन्वित कारवाईमुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, पुढील तपासात आणखी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ATSकडून या संपूर्ण प्रकरणाचा सर्वंकष तपास सुरू असून, तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही शक्यतेला नाकारले जात नसल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ