Siya-ketan Case Update : मोबाईलमधील डेटा रिकव्हर; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवे खुलासे

spot_img

पुण्यात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे अनेक धक्कादायक तपशील समोर येत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या प्रकरणातील संशयित चेतन आणि सिया यांनी सुमारे चार महिन्यांपूर्वी कोणालाही न सांगता गुपचूप विवाह केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या कथित विवाहाची माहिती दोघांनीही आपल्या कुटुंबीयांपासून लपवून ठेवल्याचे तपासातून समोर आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा तपास करताना पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांचे मोबाईल फोन जप्त करून त्यातील डिलीट केलेला डेटा तांत्रिक पद्धतीने पुन्हा मिळवला. या प्रक्रियेदरम्यान व्हॉट्सअॅप चॅटसह इतर डिजिटल पुराव्यांमधून त्यांच्या संबंधांबाबत आणि कथित विवाहाबाबत काही महत्त्वाचे संकेत मिळाल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली असून, हत्या घडवून आणण्यापूर्वी दोघांनी काही गुन्हेगारी आशयाच्या वेबसिरीज आणि चित्रपट पाहिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या माध्यमांतून गुन्हा करण्याच्या पद्धती, पुरावे लपवण्याचे मार्ग किंवा नियोजनाशी संबंधित माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाला का, याचाही तपास सुरू आहे. मात्र, या सर्व बाबींची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून पोलिसांकडून डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि इतर साक्षीदारांच्या जबाबांची पडताळणी केली जात आहे. या नव्या खुलाशांमुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने अधिकच गंभीर वळण घेतले असून, तपास यंत्रणा प्रत्येक पुराव्याची बारकाईने छाननी करत आहे. पुढील तपासातून या प्रकरणामागील नेमका हेतू आणि घटनाक्रम अधिक स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ