ओतूर,प्रतिनिधी:दि.७ जुलै [ रमेश तांबे ]
मद्यपान करून वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर यापुढे दंडात्मक कारवाई करून थेट जेलची हवा खावी लागणार आहे.दारू पिऊन मोटारसायकल किंवा कोणतेही वाहन चालवताना आढळल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे यांनी एका कारवाई दरम्यान सांगितले.
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांच्या मुसक्या आवळण्यासाठी ओतूर पोलीस प्रशासनाने आता अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. शनिवारी दि.४ रोजी सायंकाळचया सुमारास अहील्यानगर- कल्याण महामार्गावर उदापुर गावच्या हद्दीत बनकरफाटा या ठिकाणी नाकाबंदी दरम्यान राजाराम बाळु दुधवडे वय ३५ वर्षे रा. म्हसवंडी ता.संगमनेर हा महामार्गावर दारू पिऊन दुचाकी चालवत असताना मिळून आल्याने त्याच्या विरूध्द ओतूर पोलीस स्टेशनला दि.४ कलम १८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच त्याच दिवशी
त्याच ठिकाणी नाकाबंदी चालू असताना योगेश शिवाजी गोडे वय ३५ वर्षे रा.पिंपळगाव जोगा,ता.जुन्नर जि.पुणे हा अहील्यानगर- कल्याण महामार्गावर दारू पिऊन दुचाकी चालवत असताना मिळून आल्याने त्याच्या विरूध्द कलम १८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोघांना न्यायालयाने प्रत्येकी दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच दि.४ मोरे चौक ओतूर ता.जुन्नर येथे यश उल्हास हिरे वय २५ वर्षे रा.ओतूर हा त्याच्या ताब्यातील दुचाकी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवत असताना मिळुन आल्याने त्याच्या विरूध्द ओतूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हिरे यास मा.जैन मॅडम मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो.जुन्नर न्यायालयाने पाचशे रूपयाचा दंड ठोठावला असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे यांनी दिली.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, जुन्नरचे उपविभागीय पोलीस – अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस हवालदार नामदेव बांबळे, पोलीस हवालदार बाळशिराम भवारी,पोलीस हवालदार जनार्दन सपटे,पोलीस कॉन्टेबल शामसुंदर जायभाये,किशोर बर्डे यांनी केली.
सदरच्या कारवाईमुळे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर वचक बसणार असून,यापुढे सुध्दा दारू पिवून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांचे विरूध्द अशाच प्रकारे कायदेशिर कारवाई सुरू ठेवली जाणार असल्याचे ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगीतले आहे.




