जेवणासोबत चटकदार आणि झणझणीत पदार्थ खाण्याची आवड असेल, तर झटपट तयार होणारे बटाट्याचे लोणचे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ही रेसिपी तयार करण्यासाठी प्रथम उकडलेल्या बटाट्यांची सालं काढून त्यांचे लहान चौकोनी तुकडे करून घ्यावेत. त्यानंतर मंद आचेवर मेथीचे दाणे, बडीशेप आणि मोहरी हलके भाजून थंड झाल्यावर त्यांची जाडसर पूड तयार करावी. पुढे एका कढईत मोहरीचे तेल चांगले गरम करून ते किंचित थंड होऊ द्यावे. त्यात हिंग, तयार केलेली मसाल्याची भरड, हळद आणि लाल तिखट घालून मिश्रण एकजीव करावे. या मसाल्यात बटाट्याचे तुकडे, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिसळावे. शेवटी आमचूर पावडर टाकून पुन्हा एकदा सर्व साहित्य एकत्र करावे. काही मिनिटांत तयार होणारे हे चविष्ट आणि झणझणीत बटाट्याचे लोणचे पोळी, भाकरी किंवा वरण-भातासोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
Breaking News




