Mahabaleshwar Heavy Rain : महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाचा कहर; दररोज 233 मिमी पावसाची नोंद

spot_img

सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. निसर्गरम्य वातावरण, धबधबे आणि थंड हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या या पर्यटनस्थळी सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून, अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे. दररोज सरासरी 233 मिलीमीटर पावसाची नोंद होत असल्याने प्रशासनासह स्थानिक नागरिकांची चिंता वाढली आहे. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी जमिनी खचण्याच्या घटनाही समोर आल्या असून, पर्यटकांना विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, महाबळेश्वरमधील एका स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर मोठे झाड अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत झाड हटवण्याचे काम हाती घेतले. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजनांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ