Welcome to The Jungle : ‘वेलकम टू द जंगल’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड

spot_img

अक्षय कुमार अभिनीत ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करताना दिसत आहे. 26 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवत कमाईचा वेग कायम ठेवला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या आठवड्यात सुमारे 93.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवत दमदार सुरुवात केली आहे. पेड प्रीव्ह्यूमधून 3.75 कोटींची कमाई केल्यानंतर चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.25 कोटी, दुसऱ्या दिवशी 20 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 20.75 कोटी रुपयांचे कलेक्शन नोंदवले. मात्र, विकेंडनंतर आठवड्याच्या कामकाजाच्या दिवसांमध्ये कमाईचा वेग काहीसा मंदावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पहिल्या आठवड्यातील यशानंतर चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही चांगली सुरुवात केली आहे. दरम्यान, आलिया भट्टचा ‘अल्फा’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवरील स्पर्धा आणखी रंगतदार झाली आहे. या नव्या स्पर्धेचा काही प्रमाणात परिणाम ‘वेलकम टू द जंगल’च्या कमाईवर झाल्याचे दिसून येत आहे. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अहवालानुसार, चित्रपटाने प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी सुमारे 4.50 कोटी रुपयांची कमाई केली असून, एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 97.65 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद असाच कायम राहिल्यास, हा चित्रपट लवकरच 100 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये प्रवेश करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आता दुसऱ्या शनिवारी चित्रपट किती कमाई करतो, याकडे चित्रपटसृष्टीसह चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ