TamilNadu Chief Minister Thalapathy Vijay : तामिळनाडूत मुख्यमंत्री थलपती विजय यांचा ऐतिहासिक मास्टरस्ट्रोक; स्टॅलिन सरकारचा ‘तो’ २४६ कोटींचा निर्णय रद्द!

spot_img

“हिंदू मंदिरांचा पैसा फक्त देवाच्या आणि पवित्र कार्यासाठीच”; नव्या टीव्हीके (TVK) सरकारकडून ४६ व्यावसायिक प्रकल्पांची मान्यता थेट मोडीत.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत आपल्या ‘तमिलगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षासह दणदणीत विजय मिळवून सत्तेवर आलेले अभिनेते आणि नवनियुक्त मुख्यमंत्री थलपती विजय सध्या देशभरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. राजकारणातील भल्याभल्या दिग्गजांना धूळ चारीत अत्यंत साध्या चेहऱ्यांना उमेदवारी देऊन त्यांनी थेट मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता सत्तेची सूत्रे हाती घेताच मुख्यमंत्री विजय यांनी एक असा मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे, ज्याचे हिंदू संघटनांसह सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील मागील द्रमुक (DMK) सरकारने मंदिरांच्या निधीबाबत घेतलेला एक वादग्रस्त निर्णय मुख्यमंत्री विजय यांनी थेट फिरवला आहे.

मागील डीएमके सरकारने हिंदू मंदिरांच्या तिजोरीतील पैसा आणि संसाधने वापरून तब्बल २४६ कोटी रुपये खर्चाच्या ४६ वेगवेगळ्या प्रकल्पांना मंजुरी दिली होती. यामध्ये मंदिर प्रशासनाच्या निधीतून २९ विवाह मंडप (मैरिज हॉल) आणि १७ व्यावसायिक संकुले (शॉपिंग कॉम्प्लेक्स) उभारली जाणार होती. मात्र, मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने हे सर्वच्या सर्व ४६ प्रकल्प तातडीने रद्द करण्याचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.

“मंदिरांची सर्व जंगम आणि स्थावर मालमत्ता, तसेच भाविकांनी दिलेला पैसा हा केवळ आणि केवळ धार्मिक व पवित्र कार्यांसाठीच वापरला जाईल, कोणत्याही व्यावसायिक कारणांसाठी नाही!” — **मुख्यमंत्री थलपती विजय

तामिळनाडू सरकारच्या हिंदू धार्मिक आणि धर्मादाय बंदोबस्त (HR&CE) विभागाने या संदर्भात नवीन सुधारित आदेश जारी केले आहेत. सुदैवाने, मागील सरकारने मंजूर केलेल्या या ४६ प्रकल्पांचे काम अद्याप प्रत्यक्ष जमिनीवर सुरू झाले नव्हते. त्यामुळे मंदिरांची आर्थिक स्थिती पाहता आणि हा निधी व्यावसायिक उपक्रमांमध्ये अडकण्यापासून वाचवण्यासाठी ही मंजुरी रद्द करण्यात आल्याचे प्रशासकीय आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मंदिरांचा शेकडो कोटींचा निधी आता सुरक्षित राहणार असून तो केवळ मंदिर दुरुस्ती, भाविकांच्या सेवा-सुविधा आणि धार्मिक कल्याणासाठीच खर्च केला जाईल. मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यापासून एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेणाऱ्या थलपती विजय यांच्या या ‘पॉलिसी रीसेट’मुळे तामिळनाडूच्या राजकारणात एक नवी पहाट आल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ