मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विविध दुर्घटनांच्या घटनाही समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी चेंबूर परिसरात शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता साकीनाका परिसरात आणखी एक गंभीर दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 20 ते 25 फूट खोल असलेल्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडल्याची घटना उघडकीस आली असून, त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. सततच्या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.




