Mumbai : पनवेल-सीएसएमटी लोकलमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा; जीवे मारण्याच्या धमकीच्या व्हिडीओने खळबळ

spot_img

मुंबई उपनगरी रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलीकडील काही हिंसक घटनांनंतर आता पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मार्गावरील लोकल ट्रेनमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये, मद्यधुंद अवस्थेतील एका व्यक्तीने लोकल डब्यात गोंधळ घालत प्रवाशांना धमकावल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात आहे. संबंधित व्यक्तीने मोठ्या आवाजात शिवीगाळ करत एका प्रवाशाला थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले जात आहे.

तसेच, त्याने यापूर्वीही गंभीर गुन्हे केल्याचा दावा करत इतरांना आव्हानात्मक भाषा वापरल्याचेही व्हिडीओत ऐकू येत असल्याची चर्चा आहे. या घटनेच्या वेळी डब्यात दिव्यांग प्रवाशांसह अनेक नागरिक उपस्थित होते. या प्रकारामुळे लोकल प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत अधिक कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ