Ikka Trailer Out : ‘दामिनी’नंतर ३३ वर्षांनी सनी देओल पुन्हा वकिलाच्या भूमिकेत; ‘इक्का’च्या ट्रेलरमध्ये अक्षय खन्नासोबत होणार जोरदार टक्कर!

spot_img

सनी देओलचे ओटीटीवर धमाकेदार पदार्पण; जबरदस्त सस्पेन्स आणि कोर्टरूम ड्रामाने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

‘धुरंधर’ चित्रपटातील रेहमान डकैतच्या दमदार भूमिकेनंतर अभिनेता अक्षय खन्ना आता पुन्हा एकदा एका तगड्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आगामी ‘इक्का’ या चित्रपटात तो ‘रेहमान डकैत’लाही तोडीस तोड उत्तर देणारी व्यक्तिरेखा साकारत असून, या चित्रपटाचा खिळवून ठेवणारा ट्रेलर नुकताच प्रेक्षकभेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडचा ‘अँग्री यंग मॅन’ सनी देओल डिजिटल (OTT) विश्वात आपले पहिले पाऊल टाकत आहे. तब्बल ३३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘दामिनी’ चित्रपटात सनी देओलने साकारलेली वकिलाची भूमिका आणि त्याचा खणखणीत आवाज आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. आता ‘इक्का’मध्ये तो पुन्हा एकदा ‘वकील अर्जुन मेहरा’च्या भूमिकेत कोर्टरूम गाजवताना दिसणार आहे.

ट्रेलरची सुरुवातच एका गंभीर कोर्टरूममधील दृश्याने होते, जिथे सनी देओल “त्या रात्री नेमके काय घडले, हे तुम्ही न्यायालयाला सांगाल का?” असा सवाल विचारताना दिसतो. त्यानंतर पडद्यावर एन्ट्री होते ती अक्षय खन्नाची, जो प्रसिद्ध उद्योगपती हर्षवर्धन गौर यांचा मुलगा ‘शौर्यमान’ची भूमिका साकारत आहे. शौर्यमानवर एका महिलेच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आहे. संपूर्ण जगाच्या नजरेत शौर्यमान हाच खरा गुन्हेगार आहे, मात्र स्वतःवरील कलंक पुसण्यासाठी तो अर्जुन मेहरा यांची आपली केस लढण्यासाठी निवड करतो. अर्जुन मेहरा हा असा वकील आहे ज्याने आपल्या कारकिर्दीत आजवर एकही केस हरलेली नाही.

‘इक्का’च्या या २५ सेकंदांच्या क्लिप आणि ट्रेलरमध्ये जबरदस्त सस्पेन्स, थ्रिलर आणि अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अक्षय खन्नाचा डॅशिंग लूक आणि अंदाज प्रचंड प्रभावी वाटत असून, सनी देओलसोबतची त्याची ऑन-स्क्रीन जुगलबंदी पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत. हा चित्रपट सस्पेन्सचा एक नवा थरार प्रेक्षकांसमोर आणणार हे ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ