Naseeruddin Shah : “दुसऱ्याच्या संकटावर हसणे हे आपले राष्ट्रीय वैशिष्ट्य!” बॉलिवूडमधील ‘स्टीरियोटायपिंग’वर अभिनेते नसीरुद्दीन शाह भडकले

spot_img

‘मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी’मुळे चर्चेत असलेल्या नसीरुद्दीन शाह यांनी व्यक्त केला संताप; सुशिक्षित लोकांच्या ‘इस्लामद्वेषा’वरही ओढले ताशेरे

आपल्या सहज आणि सशक्त अभिनयाने सिनेसृष्टी समृद्ध करणारे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह सध्या त्यांच्या ‘मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी’ या नव्या सीरिजला मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादामुळे चर्चेत आहेत. मात्र, केवळ अभिनयापुरते मर्यादित न राहता समाजातील आणि सिनेसृष्टीतील ज्वलंत मुद्द्यांवर नेहमीच परखड मते मांडणारे अभिनेते म्हणून त्यांची ओळख आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात नसीरुद्दीन शाह यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील पारंपरिक पद्धतींवर आणि विशिष्ट समुदायांच्या केल्या जाणाऱ्या थट्टेवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून, त्यात त्यांनी बॉलिवूडमध्ये मनोरंजनाच्या नावाखाली चालणाऱ्या ‘स्टीरियोटायपिंग’चा (विशिष्ट साच्यात पात्रांना दाखवणे) चांगलाच समाचार घेतला आहे.

नसीरुद्दीन शाह यांनी खंत व्यक्त करताना सांगितले की, “हिंदी सिनेमाने आजवर एकाही धर्माला सोडलेले नाही; आम्ही स्टीरियोटायपिंगचे मास्टर आहोत. चित्रपटांमध्ये शीख, पारशी आणि ख्रिश्चन बांधवांची नेहमीच थट्टा-मस्करी केली गेली, तर दुसरीकडे मुस्लिम पात्राला नेहमीच असा एक प्रामाणिक मित्र दाखवले गेले जो मुख्य नायकाचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव देतो आणि त्याचा मृत्यू नेहमी निश्चित असतो.” पुढे बोलताना त्यांनी भारतीय मानसिकतेवर थेट बोट ठेवत म्हटले की, दुसऱ्याच्या दुःखावर किंवा संकटावर आनंद व्यक्त करणे हे आपले एक राष्ट्रीय वैशिष्ट्य बनले आहे. आपल्याला स्वतःवर हसता येत नाही, पण इतरांची चेष्टा करताना आपण क्षणभरही विचार करत नाही; दुर्दैवाने आपल्या चित्रपटांनी याच गोष्टीला खतपाणी घालत लोकांना प्रोत्साहित केले आहे.

एका मुलाखतीचा संदर्भ देत नसीरुद्दीन शाह यांनी सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. रुपेरी पडद्यावर दाखवले जाणारे संदर्भ हे आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचेच प्रतिबिंब असतात, असे स्पष्ट करत त्यांनी सुशिक्षित वर्गामध्ये वाढणाऱ्या ‘इस्लामद्वेषा’वर (Islamophobia) थेट निशाणा साधला. निवडणुकीत मते मिळवण्यासाठी आणि स्वतःची विशिष्ट विचारसरणी प्रस्थापित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी लोकांच्या मनात हुशारीने द्वेष रुजवला असून, आजच्या काळात मुस्लिमांचा तिरस्कार करणे ही एक प्रकारची ‘फॅशन’ झाली असल्याची गंभीर आणि चिंताजनक टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ