Urmila Matondkar Ex Husband Remarriage : उर्मिला मातोंडकरसोबत घटस्फोटानंतर मोहसिन अख्तर मीर पुन्हा अडकला लग्नबंधनात! सोशल मीडियावर शेअर केला ‘त्या’ मिस्ट्री गर्लसोबतचा फोटो

spot_img

लग्नाच्या ८ वर्षांनंतर २०२४ मध्ये झाले होते विभक्त; हातातील डायमंड रिंग आणि मेहंदीचा फोटो पोस्ट करत मोहसिनने दिली नव्या संसाराची हिंट

आपल्या अष्टपैलू अभिनयाने बॉलिवूड गाजवणारी ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकर गेल्या काही काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी ती आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच प्रकाशझोतात असते. मात्र, आता उर्मिला नाही तर तिचा माजी पती मोहसिन अख्तर मीर हा त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. उर्मिलासोबत कायदेशीररित्या घटस्फोट घेतल्यानंतर मोहसिनने आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली असून त्याने दुसरा संसार थाटल्याचे बोलले जात आहे. नुकताच मोहसिनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास फोटो स्टोरीमध्ये शेअर केला आहे, जो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याने एका महिलेचा हात हातात धरला असून, त्या ‘मिस्ट्री गर्ल’च्या हातावर नववधूसारखी सुंदर मेहंदी आणि दोघांच्या बोटांत चमचमणारी डायमंड रिंग (हिऱ्याची अंगठी) स्पष्टपणे दिसून येत आहे.

उर्मिला आणि काश्मिरी व्यावसायिक-मॉडेल मोहसिन अख्तर मीर २०१६ मध्ये अत्यंत खाजगी स्वरूपाच्या सोहळ्यात लग्नबंधनात अडकले होते. मात्र, त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही. लग्नाच्या ८ वर्षांनंतर त्यांच्या संसारामध्ये वादळ आले आणि दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा मोठा निर्णय घेतला. २०२४ मध्ये न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले. या घटनेच्या साधारण दीड वर्षानंतर आता मोहसिनने नव्या सुखी जीवनाची सुरुवात केली आहे. मात्र, शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याने आपल्या नव्या जोडीदाराचा चेहरा पूर्णपणे लपवून ठेवला आहे आणि तिचे नाव किंवा कोणतीही माहिती उघड केलेली नाही. त्यामुळे मोहसिनच्या आयुष्यात आलेली ही नवी महिला नेमकी कोण आहे, याबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, या घटस्फोटानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मात्र सिंगल राहून आपले आयुष्य जगण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ