Operation CheckMate : अमेरिकेत अवैधपणे ट्रक चालवणाऱ्या ३० भारतीयांना अटक; ‘ऑपरेशन चेकमेट’ अंतर्गत होणार मायदेशी डिपोर्ट

spot_img

बायडेन प्रशासनाच्या काळातील रोजगार कागदपत्रे ठरली अवैध; व्हिसा नियमांमधील कडक बदलांमुळे भारतीय नोकरदारांना मोठा फटका

अमेरिकेत बेकायदेशीररी्या वास्तव्य करून व्यावसायिक वाहन चालवणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात तेथील प्रशासनाने मोठी मोहीम उघडली आहे. अमेरिकी कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शनने ११ ते १५ मे दरम्यान ‘ऑपरेशन चेकमेट’ अंतर्गत केलेल्या धडक कारवाईत ५२ जणांना ताब्यात घेतले, ज्यामध्ये तब्बल ३० भारतीय नागरिकांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेले हे सर्व भारतीय कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क आणि व्हर्जिनिया या राज्यांमध्ये व्यावसायिक ट्रकचालक म्हणून काम करत होते. तपासणीदरम्यान त्यांच्याकडे जो बायडेन यांच्या प्रशासनाच्या काळातील रोजगाराची कागदपत्रे आढळून आली, जी अमेरिकेने अवैध ठरवली आहेत. या सर्व ३० भारतीयांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना लवकरच भारतात डिपोर्ट (मायदेशी रवाना) केले जाणार असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे.

अमेरिकेच्या सुरक्षा एजन्सीने स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक सुरक्षेला आणि रस्त्यांवरील प्रवाशांना धोका निर्माण करणाऱ्या बेकायदेशीर चालकांपासून समुदायाचे रक्षण करण्यासाठी ही कठोर पावले उचलली जात आहेत. गेल्या काही काळापासून अमेरिकेने आपल्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणांतर्गत व्हिसाच्या नियमांमध्ये सातत्याने मोठे बदल करण्यास सुरुवात केली असून, त्याचा थेट आणि मोठा फटका भारतीयांना बसत आहे. यामध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या ‘H1B’ व्हिसाचे नियम कडक करण्यात आले असून, त्यासाठी आता पूर्वीपेक्षा मोठी रक्कम मोजावी लागत आहे. अमेरिकेच्या या नव्या भूमिकेमुळे आणि कठोर नियमांमुळे विशेषतः आयटी (IT) क्षेत्रात काम करणाऱ्या उच्चशिक्षित भारतीयांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच, आता स्थानिक पातळीवर अवैधपणे काम करणाऱ्या कामगारांवरही अमेरिकेने थेट बडगा उगारल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ