Positive Corner : घरात तयार करा ‘पॉझिटिव्ह कॉर्नर’; तणावमुक्त आणि शांत आयुष्यासाठी खास उपाय

spot_img

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये मानसिक ताण आणि थकवा वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत घरामध्ये एक असा खास कोपरा असणे आवश्यक मानले जाते, जिथे काही वेळ शांत बसून मन प्रसन्न आणि रिलॅक्स होऊ शकेल. तज्ज्ञांच्या मते, घरातील छोटासा ‘पॉझिटिव्ह कॉर्नर’ मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या ठिकाणी बसल्यानंतर दिवसभराचा ताण हलका होण्यास मदत होते आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते.

हा खास कोपरा अधिक आकर्षक आणि शांततादायी बनवण्यासाठी लहान इनडोअर प्लांट्सचा वापर करता येऊ शकतो. मनी प्लांट, पीस लिली, स्नेक प्लांट किंवा बांबूसारखी झाडे वातावरण ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात. यासोबतच सुगंधी मेणबत्त्या, अगरबत्ती किंवा इसेंशियल ऑईल वापरल्यास मन शांत राहण्यास मदत होते. लॅव्हेंडर, चंदन किंवा मोगऱ्याचा सुगंध तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त मानला जातो.

या कोपऱ्यात आरामदायी बसण्याची व्यवस्था असणेही महत्त्वाचे आहे. चटई, कुशन किंवा आरामखुर्ची ठेवून हा भाग अधिक रिलॅक्सिंग बनवता येतो. तसेच तेजस्वी प्रकाशाऐवजी सौम्य आणि वॉर्म लाईट्स वापरल्यास वातावरण अधिक शांत वाटते. ज्यांना अध्यात्माची आवड आहे त्यांनी येथे देवाची मूर्ती, प्रेरणादायी पुस्तके किंवा सुंदर चित्रे ठेवू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, हा पॉझिटिव्ह कॉर्नर वापरताना मोबाईल, लॅपटॉप किंवा ऑफिसचे काम पूर्णपणे दूर ठेवणे गरजेचे आहे. हा भाग फक्त ध्यान, वाचन, शांत बसणे आणि डिजिटल डिटॉक्ससाठी वापरावा. तसेच हा कोपरा नेहमी स्वच्छ आणि मोकळा ठेवल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा अधिक प्रभावीपणे जाणवू शकते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ