Fatah 1 Missile : भारतात नसलेल्या २ एअरबेसवर क्षेपणास्त्र डागल्याचा पाकिस्तानी कॅप्टनचा दावा

spot_img

जिओ न्यूजच्या मुलाखतीत पाक लष्कराचे पितळ उघडे; सोशल मीडियावर नेटीझन्सकडून उडवली जातेय प्रचंड खिल्ली

भारत आणि पाकिस्तान दरम्यान गेल्या वर्षी झालेल्या ४ दिवसांच्या तीव्र सैन्य संघर्षानंतर आता दोन्ही देशांतील माहिती युद्ध (Information War) रंगात आले आहे. मागच्या वर्षी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांची हत्या केल्यावर भारताने चोख प्रत्युत्तर देत ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत हवाई हल्ले केले होते. भारताच्या या आक्रमक कारवाईने घाबरलेल्या पाकिस्तानने ‘ऑपरेशन बुनयान अल-मरसूस’ (Operation Bunyan-un-Marsoos) ची घोषणा केली होती. या काळात भारतीय सैन्याने ब्राह्मोस मिसाईल्सच्या साहाय्याने पाकिस्तानी हवाई दलाच्या धावपट्ट्या उद्ध्वस्त केल्याचे संपूर्ण जगाने पाहिले. मात्र, स्वतःचा पराभव लपवण्यासाठी पाकिस्तानी लष्कर आपल्या जनतेला कशा प्रकारे मूर्ख बनवत आहे, याचे एक हास्यास्पद उदाहरण नुकतेच समोर आले आहे.

पाकिस्तानचे प्रसिद्ध वृत्तवाहिनी ‘जियो न्यूज’ने नुकतीच एक विशेष मुलाखत घेतली. यामध्ये ‘ऑपरेशन बुनयान अल-मरसूस’ दरम्यान भारतावर ‘फतह-१’ (Fateh-1) हे गाईडेड मिसाईल्स डागणाऱ्या टीमचे सदस्य सहभागी झाले होते. शोच्या अँकरने थेट प्रश्न विचारला की, “तुमच्या फतह-१ मिसाईलने भारतातील दिलेल्या लक्ष्यांचा अचूक वेध घेतला का?” यावर उत्तर देताना टीमचे नेतृत्व करणारे कॅप्टन मुनीब जमाल यांनी अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले की, “होय, आम्हाला दोन मोठी लक्ष्ये देण्यात आली होती—राजौरी एअरबेस आणि मामून एअरबेस. आम्ही दोन्ही ठिकाणी अत्यंत यशस्वी आणि अचूक हल्ला करून ते उद्ध्वस्त केले.”

हा इंटरव्ह्यू पाकिस्तानात मोठ्या अभिमानाने दाखवला गेला खरा, पण सोशल मीडियावर ही बातमी येताच पाकिस्तानी लष्कराच्या या दाव्याचे पुरते धिंडवडे निघाले आहेत. डिफेन्स एक्सपर्ट्स आणि नेटीझन्सनी जेव्हा या दाव्याची पडताळणी केली, तेव्हा समोर आले की भारतात ‘राजौरी एअरबेस’ आणि ‘मामून एअरबेस’ नावाचे भारतीय हवाई दलाचे (IAF) कोणतेही बेस अस्तित्वातच नाहीयेत!

हा जम्मू-काश्मीरमधील एक जिल्हा आहे, जिथे भारतीय लष्कराचे (Indian Army) काही युनिट्स तैनात आहेत. परंतु, तिथे हवाई दलाचा कोणताही ‘एअरबेस’ नाही. हा पंजाबमधील पठाणकोटजवळील लष्कराचा एक मिलिटरी कॅन्टोन्मेंट (लष्करी छावणी) भाग आहे, जिथे ब्रिगेड आणि युनिट्स कार्यरत आहेत. पण तिथेही कोणताही ‘एअरबेस’ अस्तित्वात नाही.

भारतात पठाणकोट, जम्मू, श्रीनगर आणि उधमपूर या ठिकाणी भारतीय हवाई दलाचे प्रसिद्ध एअरबेस आहेत. मात्र, भारतावर हल्ला केल्याची बतावणी करणाऱ्या पाकिस्तानी कॅप्टनला एकाही भारतीय एअरबेसचे खरे नाव घेता आले नाही. यावरून सोशल मीडियावर युजर्स पाकिस्तानची जोरदार फिरकी घेत आहेत. “आमच्या मिसाईल्सनी इतका जोरदार हल्ला केला की ते एअरबेस नकाशावरूनच नाही तर थेट अस्तित्वातूनच गायब झाले!” अशा शब्दांत युजर्सनी पाकिस्तानी लष्कराची आणि त्यांच्या माध्यमांची गोबेल्सनीती उघडी पाडली आहे. या गंभीर चुकीमुळे पाकिस्तानी मीडिया आणि त्यांच्या सैन्याच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ