Mumbai Railway Mega block Updates : मुंबईकरांनो, रविवारी भटकंतीचा प्लॅन फ्लॉप होऊ नये म्हणून ‘हे’ वेळापत्रक नक्की वाचा; तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक!

spot_img

मध्य आणि हार्बर मार्गावर दिवसा, तर पश्चिम रेल्वेवर रात्री घेतला जाणार मेगाब्लॉक; लोकल फेऱ्यांवर आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होण्याची शक्यता

मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल गाड्यांच्या अहोरात्र धावण्यामुळे होणारी झीज भरून काढण्यासाठी आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्तीसाठी उद्या, रविवार १७ मे रोजी रेल्वे प्रशासनाने तिन्ही मार्गांवर ब्लॉक घोषित केला आहे. त्यामुळे जर तुम्ही रविवारची सुट्टी किंवा मुलांच्या शाळांच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर रेल्वेचे बदललेले वेळापत्रक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या पाच तासांच्या काळात सर्व जलद गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, ज्यामुळे गाड्या काहीशा उशिराने धावतील. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी या काळात लोकल कळवा, मुंब्रा आणि दिवा या स्थानकांवर थांबतील. दुसरीकडे, हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन सेवा सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत पूर्णपणे विस्कळीत राहणार आहे. यादरम्यान सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर आणि ठाणे ते पनवेल दरम्यानच्या सर्व लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नसेल. नायगाव स्थानकात नवीन पादचारी पुलाचे दोन स्पॅन गर्डर टाकण्यासाठी आणि दादर स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी शनिवार मध्यरात्री १ ते रविवारी पहाटे ४ या वेळेत रात्रकालीन ब्लॉक घेतला जाईल. या ब्लॉकचा फटका मुंबई लोकलसह १३ मेल-एक्स्प्रेस गाड्यांना बसेल, ज्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा २० मिनिटे ते २ तास उशिराने धावतील. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ही बाब लक्षात घेऊनच आपला प्रवास करावा.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ