Nitin Gadkari : सोलापूरचे नशीब बदलणार; २०२९ पर्यंत १ लाख कोटींच्या विकासकामांची गडकरींची मोठी घोषणा

spot_img

आईची इच्छा आणि सोलापूरचा विकास; पालखी महामार्ग, रिंग रोड आणि ग्रीन फिल्ड हायवेने जिल्ह्याचा कायापालट होणार.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी विकासकामांचा डोंगर उभा करण्याची ग्वाही दिली आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या आईची भावनिक आठवण सांगितली; “मृत्यूअगोदर आईने अक्कलकोट, गाणगापूर आणि पंढरपूरचे रस्ते सुधारण्यास सांगितले होते,” असे सांगत त्यांनी या तीर्थक्षेत्रांच्या विकासाप्रती आपली कटीबद्धता व्यक्त केली. सोलापूर जिल्ह्याचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी २०२९ पर्यंत या भागात तब्बल १ लाख कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्याचा शब्द दिला.

गडकरींनी केवळ घोषणाच केल्या नाहीत, तर सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याच्या रिंग रोडला मंजुरी दिली असून, प्रलंबित उड्डाणपुलांचे प्रश्नही मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. “मी खोटे बोलत नाही, जे सांगतो ते करून दाखवतो,” अशा शब्दांत त्यांनी आपला कामाचा धडाका मांडला. सूरत-चेन्नई आणि मुंबई-बेंगलोर यांसारख्या ग्रीन फिल्ड एक्सप्रेसवेमुळे सोलापूर हे भविष्यात मोठे ‘लॉजिस्टिक हब’ बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विकासात राजकारण न आणता, खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मागण्या मान्य करत त्यांनी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा संदेश दिला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ