Pune Crime : ओतूर पोलिसांची दमदार कारवाई;गहाळ मोबाईल मुळ मालकांना केले परत 

spot_img

ओतूर,प्रतिनिधी : रमेश तांबे

ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतुन वेगवेगळया ठिकाणावरून गहाळ झालेले साडेतीन लाख रूपये किमतीच्या १० मोबाईलचे शोध घेऊन, ओतूर पोलीसांनी मुळ मालकांना त्यांचे मोबाईल परत केल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना बाजगीरे म्हणाले की, ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणावरून एकूण दहा मोबाईल गहाळ झाले होते. त्याबाबतची माहिती मोबाईल धारकांनी ओतूर पोलीस स्टेशनला दिली होती. सदरची माहिती प्राप्त झाल्यानंतर गहाळ झालेल्या सर्व मोबाईलचे तांत्रीक विश्लेषण करून, तीन लाख पन्नास हजार रूपये किमतीचे एकूण दहा मोबाईल वेगवेगळया जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले. मोबाईलच्या मुळ मालकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या हस्ते एकूण सात मोबाईल सुपूर्त करण्यात आले आहेत.ओतूर पोलीसांच्या कामगिरीचे मोबाईल धारक व परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे. सदरची कामगिरी जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील,ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदिप आमणे, पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे, पोलीस हवालदार बाळशिराम भवारी, पोलीस कॉन्टेबल आशिष जगताप तसेच पोलीस मित्र मुस्तफा मनियार यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ