IPL 2026 Points Table : दिल्लीला धूळ चारून आरसीबीची गुणतालिकेत मोठी झेप; नेट रनरेटमध्ये मोडले सर्व रेकॉर्ड

spot_img

पंजाब किंग्स अजूनही ‘नंबर १’ वर कायम; पराभवानंतर दिल्लीची घसरण, तर मुंबई आणि लखनौ शेवटच्या पायरीवर

इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामातील ३९ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) दिल्ली कॅपिटल्सचा ९ गडी राखून अक्षरशः धुव्वा उडवला. २७ एप्रिल रोजी झालेल्या या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले, ज्यामुळे दिल्लीचा संघ जेमतेम ७५ धावांपर्यंत मजल मारू शकला. हे माफक आव्हान आरसीबीने अवघ्या एका विकेटच्या बदल्यात पूर्ण करत हंगामातील आपला सहावा विजय नोंदवला. या विजयानंतर गुणतालिकेतील (Points Table) समीकरणे बदलली नसली तरी, आरसीबीने आपल्या ‘नेट रनरेट’मध्ये घेतलेली झेप इतर संघांसाठी धोक्याची घंटा ठरली आहे.

सामन्यापूर्वी आरसीबी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी होती आणि विजयानंतरही त्यांचे स्थान कायम आहे. मात्र, ८१ चेंडू राखून मिळवलेल्या या मोठ्या विजयामुळे आरसीबीचा नेट रनरेट आता +१.९१९ वर पोहोचला आहे, जो स्पर्धेतील सर्व १० संघांमध्ये सर्वोत्तम आहे. आरसीबीच्या खात्यात आता ८ सामन्यांनंतर १२ गुण जमा झाले असून ते अव्वल स्थानी असलेल्या पंजाब किंग्सच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सला या पराभवाचा मोठा फटका बसला असून त्यांचा नेट रनरेट उणे (-१.०६०) झाला आहे. दिल्ली सध्या ६ गुणांसह सातव्या क्रमांकावर अडकून पडली आहे.

गुणतालिकेत सध्या पंजाब किंग्सचे वर्चस्व कायम आहे. ७ सामन्यांत १३ गुणांसह पंजाब अद्याप अजिंक्य असून ते पहिल्या स्थानावर विराजमान आहेत. पंजाब आणि आरसीबीमध्ये आता केवळ १ गुणाचा फरक उरला आहे. तिसऱ्या क्रमांकावर १० गुणांसह सनरायझर्स हैदराबाद आहे, तर राजस्थान रॉयल्स (चौथे) आणि गुजरात टायटन्स (पाचवे) यांनी आपले स्थान टिकवून ठेवले आहे. चेन्नई सुपर किंग्स सहाव्या क्रमांकावर आहे. मात्र, एकेकाळचे चॅम्पियन्स असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (आठवे), मुंबई इंडियन्स (नववे) आणि लखनौ सुपर जायंट्स (दहावे) यांची अवस्था बिकट असून त्यांना प्ले-ऑफ गाठण्यासाठी आता प्रत्येक सामना ‘करा किंवा मरा’ असा झाला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ