Crime News : जबरी चोरी,चेन स्नॅचिंग,घरफोडी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक 

spot_img

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पारगाव,नारायणगाव,घोडेगाव,जुन्नर,आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत जबरी चोरी,चेन स्नॅचिंग,घरफोडी,चोरी चे गुन्हे करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करून त्यांचेकडून एकूण सहा गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश, गुन्ह्यात चोरी गेलेले सुमारे विस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने एक पल्सर मोटार सायकल,दोन बंब असा एकूण सुमारे २९ लाख रूपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

हर्षल दत्तात्रय तांदळे, वय २५ वर्षे, रा. भीमाशंकर सोसायटी, मार्केट यार्ड च्या पाठीमागे, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे, महेश दत्तात्रय मंगळवेढेकर, वय २५ वर्षे, रा. मुळे वाडी रोड, मंचर, ता. आंबेगाव जि.पुणे अशी आरोपींची नावे आहेत.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सन २०२५-२०२६ मधील दाखल जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांचा पोलीअधीक्षक साो. पुणे ग्रामीण यांनी आढावा घेवून, रेकॉर्डवरील सराईत आरोपींवर लक्ष केंद्रीत करून तपास करावा याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना आदेश केले होते.

स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांनी तपास पथकांना योग्य मार्गदर्शन करून दाखल गुन्ह्यांमधील गुन्हे कार्यपद्धती, घटनेचा वेळ, घटनेचे ठिकाण याबाबत योग्य माहिती घेवून रेकॉर्डवरील आरोपींची गुन्हे कार्यपद्धती पडताळावी असे सुचीत केले आणि तपासासाठी तीन तपास पथके नियुक्त केली.


स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकांनी गुन्ह्याचा तपास सुरू करून, घटनास्थळी भेट दिली, आजु बाजूचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फिर्यादी व साक्षीदार यांचेशी संवाद साधून आरोपींचे वर्णन व गुन्ह्यांच्या कार्यपद्धती बाबत माहिती मिळविली. नारायणगाव, मंचर पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील आरोपी हर्षल तांदळे व महेश मंगळवेढेकर रा. मंचर ता. आंबेगाव जि. पुणे यांचा काही गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली, त्या अनुषंगाने पथकाने खात्री करून आरोपी हर्षल दत्तात्रय तांदळे, महेश दत्तात्रय मंगळवेढेकर यांना दि.१६ एप्रिल रोजी पारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पोंदेवाडी फाटा परिसरातून ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्यांनी खालीलप्रमाणे गुन्हे केले असून त्यांचेकडून खालील गुन्ह्यात चोरी केलेल्या मुद्देमाला पैकी, वीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, एक पल्सर मोटार सायकल, दोन बंब असा एकूण सुमारे २९ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपी हर्षल दत्तात्रय तांदळे याच्यावर मंचर, नारायणगाव, घोडेगाव, पारगाव, आळेफाटा, जुन्नर पोलीस स्टेशन येथे यापुर्वी घरफोडी, चोरी चे सात गुन्हे दाखल असून, त्याचेवर यापुर्वी प्रतिबंधक कारवाई करणेत आलेली आहे. तसेच त्यास जानेवारी २०२६ मध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यातुन एक वर्ष कालावधीकरीता हद्दपार करण्यात आलेले आहे. तसेच आरोपी महेश दत्तात्रय मंगळवेढेकर याचेवर चाकण, वाकड पोलीस स्टेशन येथे यापुर्वी दरोडा, चोरी चे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत 

सदरची कामगीरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिप सिह गिल्ल,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर,सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव शेलार,सहाय्यक फौजदार दिपक साबळे,पोलीस हवालदार संदीप वारे,पोलीस हवालदार अक्षय नवले,राजू मोमीन यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ