Sanjay Raut : संजय राऊतांनी स्पष्ट केली ‘दिल्ली’पर्यंतची रणनीती

spot_img

राज्यात सध्या विधान परिषदेच्या १० जागांच्या निवडणुकीचे वारे वाहत असून, उद्धव ठाकरे यांनी स्वतः या सभागृहात जावे, यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ठाकरेंची भेट घेऊन त्यांना उमेदवारी अर्ज भरण्याची गळ घातली आहे. संजय राऊत यांनी या घडामोडींना दुजोरा देताना सांगितले की, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापासून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीपर्यंत सर्वांचीच हीच इच्छा आहे. मात्र, ठाकरे स्वतः यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

दुसरीकडे, रिक्षाचालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. “महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी आलीच पाहिजे,” असे ठणकावून सांगतानाच त्यांनी शिंदे गटातील अंतर्गत विरोधावरही निशाणा साधला. विधान परिषदेच्या या रणधुमाळीत आता उद्धव ठाकरेंच्या संमतीची प्रतीक्षा असून, १२ मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ